Union Finance Minister Nirmala Sitharaman asserted that Micro, Small and Medium Enterprises are the backbone of the Indian economy
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन
मुंबई : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज मुंबईत लघु उद्योग भारती ‘प्रदेश अधिवेशन २०२२’ या परिषदेचे उद्धघाटन करताना बोलत होत्या.
जागतिक स्तरावर १० वर्षात भारत ११ व्या क्रमांकावरून ५ व्या क्रमांकावर आला आहे. कोरोना, रशिया आणि युक्रेन युद्ध, पुरवठा साखळीची मर्यादा अशा कठीण परिस्थितीतून आपली वेगानं वाढ झाली आहे, असं त्यांनी सांगितलं.
शेतीमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाचा प्रभाव आहे. कौशल्यावर लक्ष केंद्रित करून डिजिटल जग आत्मसात केलं पाहिजे, असं त्या म्हणाल्या.
यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. केंद्र सरकार हमी घेत असल्यानं बँकेच्या माध्यमातून उद्योगाला मदत मिळत आहे, असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी यावेळी सांगितलं.
या परिषदेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगातील वित्त, कृषी उत्पादनं आणि अन्न प्रक्रिया ऊद्योगातल्या संधी, उद्योगासाठी निर्यातीच्या संधी, उद्योगासाठी ब्रँडिंग आणि मार्केटिंगचे महत्त्व आदी विषयावर चर्चा करण्यात आली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com