Mikhail Gorbachev, the last president of the Soviet Union, passed away
सोव्हिएत रशिया संघराज्याचे शेवटचे राष्ट्रपती ज्येष्ठ नेते मिखाइल गोर्बाचेव यांचं निधन
ग्लासनोस्टने रशियन आणि पूर्व युरोपीय लोकांना साम्यवादाच्या विरोधात बोलण्यासाठी प्रोत्साहित केले तर पेरेस्ट्रोइका हा सोव्हिएत राज्याचे आधुनिकीकरण आणि ‘पुनर्बांधणी’ करण्याचा प्रयत्न होता.
अमेरिकेचे नेते रोनाल्ड रीगन यांच्यासोबत ऐतिहासिक अण्वस्त्रांच्या करारासाठी त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. बर्लिनची भिंत पडली तेव्हा सोव्हिएत सैन्याला रोखण्याचा त्यांचा निर्णय शीतयुद्धातील शांतता टिकवण्यासाठी महत्त्वाचा होता. त्यांच्या निधनाने जगाने एक अतुलनीय शांतीचा उपदेशक गमावला.
माजी सोव्हिएत नेत्याला जगभरातून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस (यूएनचे ) अँटोनियो गुटेरेस म्हणाले, त्यांनी इतिहासाचा मार्ग बदलला आहे. ते म्हणाले, जगाने एक मोठा जागतिक नेता, वचनबद्ध बहुपक्षीय आणि शांततेचा अथक पुरस्कर्ता गमावला आहे.
गोर्बाचेव यांना १९९० मध्ये नोबेल शांति पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाबद्दल रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. गॉर्बोचेव्ह हे एक विलक्षण राजकारणी होते अशा शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. युरोपीय संघाच्या अध्यक्ष उर्सुल वॉन दर लियेन यांनी देखील गॉर्बोचेव्ह यांना आदरांजली वाहिली आहे.