सोलापूर जिल्ह्यामधे सकाळी ६ वाजून २२ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के

Hadapsar Info Media, Hadapsar Latest News, Hadapsar News हडपसर मराठी बातम्या

Mild tremors in Solapur district of Maharashtra at 6:22 am

सोलापूर जिल्ह्यामधे सकाळी ६ वाजून २२ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के

सोलापूर : महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात आज काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के बसले.

सोलापूर जिल्ह्याजवळ असलेल्या कर्नाटक राज्यातील विजयपूर हा जिल्हा भूकंपाचा केंद्रबिंदू असून सकाळचा भूकंप 4.9 रिस्टर स्केल तीव्रतेचा नोंदवला.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील गावात भूकंपाचे हादरे बसले. सोलापूर जिल्हा प्रशासनाकडूनही याबातमीला दुजोरा देण्यात आला आहे.

हा भूकंप विजयपूर जिल्ह्यातील उत्तर कर्नाटकमध्ये झाला. भूकंपामुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. सोलापूर शहरातील रामवाडी परिसरातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

भूकंपाची तीव्रता अतिशय कमी असल्यानं सोलापूरमध्ये कोणतीही हानी झालेली नाही. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात सतत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. गेल्या महिन्यात अखेरच्या आठवड्यात कर्नाटकातील हसन जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. तेव्हा ३.४ रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता होती

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *