Minister Jyotiraditya Shinde visited the Shiva Srishti project in Pune
मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी पुण्यातल्या शिवसृष्टी प्रकल्पाला भेट
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांची विचारसरणी व्यापक होती. ध्येय गाठण्यासाठी अल्प साधनसामुग्री असतांनाही कुशल सैन्याच्या माध्यमातून त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि आपल्याला वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ देश दिला असल्याचं, मत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केलं.
पुण्यातल्या आंबेगाव इथं उभारण्यात आलेल्या शिवसृष्टी प्रकल्पाला त्यांनी काल भेट दिली. शिवसृष्टी प्रकल्पातल्या शस्त्रांची पाहणी केली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी थीम पार्क कसे असेल याची चित्रफीत पहिली.
शिवाजी महाराज आणि मराठी साम्राज्याशी माझं भावनिक नातं असल्याचं सिंदिया म्हणाले. यावेळी ते म्हणाले, शिवरायांचा जीवनप्रवास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यातून मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाचे पुन्हा दर्शन घडेल. ते म्हणाले मराठा माणूस माझा संकल्प असून या प्रकल्पासाठी जी काही मदत लागेल त्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करत राहू असं ते म्हणाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाचा ध्वज बदलला त्यात छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा वापरली आहे, असंही त्यांनी सांगितलं.
बाबासाहेब पुरंदरे यांनी कायम शिवाजी महाराजांचा अभ्यास करून सामान्यांना वैचारिकतेच्या पातळीवर नेलं. शिवसृष्टी हा त्यांचा प्रकल्प असून त्याला हवी ती मदत करण्याच आश्वासन, ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com