Mirage’s string instruments will now get a GI rating
मिरजेच्या तंतुवाद्यांना आता जी आय मानांकन मिळणार
मिरजेमध्ये निर्मित तंबोरा, सतार, दिलरुबा, सारंगी, ताऊस, रुद्रविणा सुरबहार, यांसारख्या वाद्यांना देशविदेशातीतल नामांकीत कलाकारांकडून मागणी असते. जगाच्या कानाकोपऱ्यात तानपुरे, सतार, सारंगी, वीणा, रुद्रवीणा, बुलबुल अशी असंख्य प्रकारची तंतुवाद्यं जातात. दिवसरात्र अखंड इथं ही वाद्यं घडवण्याचं काम सुरु असतं.
तंतुवाद्याचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातल्या मिरजच्या तंतुवाद्यांना आता जी आय मानांकन मिळणार असून जी आय मानांकन मिळणारा तंतुवाद्य हा देशातला पहिलाच वाद्यप्रकार ठरणार आहे.
या मानांकनामुळं मिरजमध्ये तयार होणाऱ्या विविध वाद्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची ओळख मिळणार असल्यानं या वाद्यांच्या परदेशी निर्यातीला मोठा वाव मिळणार आहे.
हे मानांकन मिळवण्यासाठी जीएस म्युझिकल्स संस्थेचे तंतुवाद्यनिर्माते अलताफ आणि झाकीर मुल्ला यांनी प्रधानमंत्री कार्यालयापर्यंत पाठपुरावा केला होता.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com