Prime Minister Narendra Modi will inaugurate the 5G mobile service on October 1
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी एक ऑक्टोबर रोजी 5 जी मोबाईल सेवाचं उद्घाटन करणार
नवी दिल्ली: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी एक ऑक्टोबर रोजी 5 जी मोबाईल सेवाचं उद्घाटन करणार आहेत. केंद्रीय दूरसंचार विभागानं दिलेल्या माहितीनुसार नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर होणाऱ्या इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात या सेवेचं उद्घाटन केलं जाणार आहे.
एका ट्विटमध्ये, दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशनने म्हटले आहे की, 5G सेवांची सुरुवात देश भारताचे डिजिटल परिवर्तन आणि कनेक्टिव्हिटीला नवीन उंचीवर नेईल.
या सेवेमुळे यामुळे देशातील दळवळण आणि डीजिटल सेवा अधिक गतीमान होणार आहे. दळणवळण विभाग आणि सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं एक ते चार ऑक्टोबर या काळात इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
आशियामधील सर्वात मोठ्या अशा कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, निर्मला सीतारामन आणि धर्मेंद्र प्रधान उपस्थित राहणार आहेत. तसंच रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, भारती एअरटेलचे सुनील मित्तल आणि व्होडाफोन आयडिया इंडियाचे प्रमुख रवींद्र टक्कर हे देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान नियोजित इंडिया मोबाईल काँग्रेस, भारतीय दूरसंचार विभाग आणि सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. इंडिया मोबाइल काँग्रेस 2022 अर्थपूर्ण संवादांद्वारे विद्यमान तंत्रज्ञानाच्या उत्क्रांती मार्गावर आणि भविष्यात व्यवसाय आणि व्यक्तींसाठी काय आहे यावर लक्ष केंद्रित करेल.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com