Launch of modular foot-free service for disabled
दिव्यांगांसाठी मोड्युलर पाय मोफत सेवेचा शुभारंभ
भारत विकास परिषदेकडून मोफत सेवा, दिव्यांगता मुक्त अभियान
पुणे : सध्याचे वर्ष हे भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्राचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिव्यांगता मुक्त अभियान राबविण्यात येत आहे. या निमित्ताने महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. (MNGL) (गेल इंडिया लि. व बी. पी. सी. एल. यांचा संयुक्त प्रकल्प) यांच्या CSR सहाय्यता निधी अंतर्गत दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम अत्याधुनिक मोड्युलर पाय उपक्रम सुरू करीत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष दत्ता चितळे, विकलांग केंद्रप्रमुख विनय खटावकर, क्षेत्रीय सेवा प्रमुख शशिकांत पदमवार व केंद्राचे संयोजक जयंत जेस्ते यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. याबाबत गरजूंनी संपर्क साधून या सेवेचा लाभ घ्यावा असेही आवाहन संयोजकांनी केले आहे.
अत्याधुनिक मोड्युलर पायाची किंमत रु. 50 हजारापेक्षा जास्त व कृत्रिम हाताची किंमत रु. 25 हजारापर्यंत आहे, मात्र भारत विकास परिषदेकडून ही सेवा मोफत देण्यात येते. विकलांग पुनर्वसन केंद्राला कोणतीही सरकारी मदत नसल्याने कागदपत्रात न अडकता, कोणतेही निकष न लावता सर्व दिव्यांगांना ही मोफत सेवा दिली जातेे.
समाजासाठी चालविण्यात येणारा हा सेवा यज्ञ आहे. या सेवा यज्ञात महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. (MNGL) आता सहभागी झाली असून अन्य इतर कंपन्यांचे/संस्थांचे आर्थिक सहकार्य संस्थेला मिळत असते.
भारत विकास परिषद ही एक राष्ट्रव्यापी स्वयंसेवी संस्था असून भारतीय नागरिकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटणारी व त्यांच्यात राष्ट्रभाव, राष्ट्रीय एकात्मता जागृत करणारी सेवा व संस्कार क्षेतात निस्वार्थपणे काम करणारी संस्था आहे.
सन 2011 च्या जनगणनेनुसार भारतात सुमारे 2.68 कोटी दिव्यांग आहेत. ही संख्या एकूण लोकसंख्येच्या 2% पेक्षा अधिक असून त्यातील 54 लाख व्यक्ती हाता-पायांनी अपंग आहेत व त्यात दरवर्षी 40 हजार जणांची भर पडत असते, याचे गांभीर्य वेळीच लक्षात घेऊन सुमारे 40 वर्षांपासून संस्थेनेे अपंग क्षेत्रात काम सुरू केले आहे.
सद्यस्थितीत विविध राज्यात मिळून संस्थेची कायमस्वरुपी 13 विकलांग केंद्र आहेत. भारतातील 13 केंद्रापैकी महाराष्ट्रातील कायमस्वरुपी विकलांग केंद्र, पुणे येथे 1997 पासून कार्यरत असून सद्यस्थितीत दरवर्षी सुमारे 2 हजार दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय, हात व कॅलिपर बसविण्यात येतात. केंद्रातील वर्कशॉपमध्ये अत्याधुनिक यंत्र सामुग्री व प्रशिक्षित तज्ज्ञांच्या द्वारे सर्व कृत्रिम अवयव बनविले जातात. पाय बसविल्यानंतर अपंग व्यक्ती चालणे, पळणे, पोहोणे, उडी मारणे, वाहन चालविणे इ. प्रकारची दैनंदिन क्रिया करू शकतात. त्याबाबत केंद्रावर तज्ज्ञांमार्फत सराव/मार्गदर्शनही केले जाते.
———————————–
संपर्कासाठी :
1) दत्ता चितळे, अध्यक्ष
मोबा. 9850048637
2) विनय खटावकर, विश्वस्त तथा विकलांग केंद्रप्रमुख, पुणे
मोबा. 9326730666
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com