The Union Health Ministry has directed the state governments to closely monitor the Covid situation in the state
राज्यातल्या कोविड स्थितीची बारकाईनं पाहणी करावी
– केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे राज्यसरकारांना निर्देश
राज्यातल्या कोविड स्थितीची जिल्हा तसंच उप जिल्हा पातळीवर बारकाईनं पाहणी करावी, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे राज्यसरकारांना निर्देश
नवी दिल्ली : राज्यातल्या कोविड स्थितीची जिल्हा तसंच उप जिल्हा पातळीवर बारकाईनं पाहणी करावी, असा सल्ला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं राज्य प्रशासनाला पत्राद्वारे दिला आहे.
राज्यातल्या काही जिल्ह्यात कोविड १९ ची वाढती संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी जलद आणि सक्षम व्यवस्थापन आवश्यक असून त्यासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यावर राज्य सरकारनं भर द्यावा असंही पत्रात म्हटलं आहे. त्यासाठी मंत्रालयानं जारी केलेल्या पाच टप्प्यातल्या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोर पालन करा, असंही मंत्रालयानं पत्रात नमूद केलं आहे.
गेल्या काही आठवड्यात देशातल्या काही भागांमधे कोविड १९ ची रूग्णसंख्या वाढत आहे. महाराष्ट्रात ८ मार्चला संपलेल्या आठवड्यात रूग्णांची साप्ताहिक संख्या ३५५ होती तर काल संपलेल्या आठवड्यात ही संख्या ६६८ झाली आहे.
पुणे, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, अहमदनगर आणि नागपूर या सात जिल्ह्यात रूग्णांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रासह गुजरात, तेलगांणा, तमिळनाडू केरळ आणि कर्नाटकालाही मंत्रालयानं हे पत्र पाठवलं आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com