Monthly Passes for Toll Plazas at National Highways
राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल प्लाझासाठी मासिक पास
नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गा वापरकर्ता शुल्क हे राष्ट्रीय शुल्क कायद्यानुसार आणि संबंधित सवलत करारानुसार आकारण्यात येते. राष्ट्रीय महामार्ग शुल्क कायदा
2008 (दर निर्धारण आणि संकलन) नुसार वाहन चालक, वाहन मालक किंवा एखादा वाहन चालवणारी व्यक्ती ,जो कोणी राष्ट्रीय महामार्गाचा वापर करत असेल किंवा येथील कायमस्वरूपी पुलाचा वापर करत असेल, पर्यायी मार्गाचा (बायपास) किंवा बोगद्याचा वापर करत असेल त्याला शुल्कामध्ये सवलतीचा पर्याय निवडता येईल.
ही सवलत ज्या दिवसापासून शुल्काची रक्कम भरली आहे तेव्हापासून एक महिन्यात जास्तीत जास्त 50 फेऱ्यांसाठी लागू असेल.यासाठी शुल्काच्या दोन तृतीयांश रक्कम भरावी लागेल. राष्ट्रीय महामार्ग शुल्क कायदा आणि संबंधित सवलत करारानुसार शुल्काच्या रकमेतली सवलत वापरकर्त्याला मासिक पासच्या स्वरूपात सुद्धा मिळू शकते.
राष्ट्रीय महामार्ग शुल्क करार 2008 नुसार, एखादा व्यक्ती जो गाडीचा मालक आहे आणि त्याने आपलं वाहन बिगर व्यावसायिक म्हणून नोंदणी केली असेल आणि तो हे वाहन राष्ट्रीय महामार्गावरच्या विभागात प्रवासासाठी वापरत असेल, तो कायमस्वरूपी पूल,पर्यायी रस्ता बायपास किंवा टनेल म्हणजेच बोगद्याचा वापर करत असेल तर त्याला सुद्धा आर्थिक वर्ष 2022- 23 साठी 315 रुपये भरून पास मिळू शकेल. मात्र यासाठी संबंधित चालक,मालक, राष्ट्रीय महामार्गापासून वीस किलोमीटर अंतराच्या परिसरात राहत असणे आवश्यक आहे.
ही माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com