देशात २ कोटीपेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना मिळाली कोविडप्रतिबंधक लशीची वर्धक मात्रा

More than 2 crore eligible beneficiaries in the country received enhanced doses of anti-covid vaccine

देशात २ कोटीपेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना मिळाली कोविडप्रतिबंधक लशीची वर्धक मात्रा

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं १८० कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत ८१ कोटी २२ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा मिळाल्या आहेत, तर २ कोटीपेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांनी वर्धकCOVID-19 vaccination मात्रा घेतली आहे.
१५ ते १८ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना ८ कोटी ९७ लाखापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत. देशभरात आज सकाळपासून ४ लाख १६ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १८० कोटी ९ लाखापेक्षा जास्त झाली आहे.

राज्यात आज सकाळपासून ८ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १५ कोटी ७६ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ६ कोटी ८४ लाखापेक्षा जास्त नागरिकांना लशींच्या दोन मात्रा मिळाल्या आहेत, तर १६ लाख २४ हजारापेक्षा जास्त  पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे.
१५ ते १८ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना एकूण ५८ लाख ८६ हजारापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *