विद्यार्थ्यांमधली गुणवत्ता शोधण्याच्या प्रक्रियेत मातृभाषेतले शिक्षण महत्त्वाचे – द्रौपदी मुर्मू

President Droupadi Murmu confers National Awards to distinguished teachers on the occasion of Teacher's day शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रतिष्ठित शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Mother tongue education is important in the process of finding quality in students – Draupadi Murmu

विद्यार्थ्यांमधली गुणवत्ता शोधण्याच्या प्रक्रियेत मातृभाषेतले शिक्षण महत्त्वाचे – द्रौपदी मुर्मू

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (५ सप्टेंबर २०२२) विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे, शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात, देशभरातील ४५ शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले.President Droupadi Murmu confers National Awards to distinguished teachers on the occasion of Teacher's day शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रतिष्ठित शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News

यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी आपल्या शिक्षकांचे स्मरण करत सांगितले की त्यांनी आपल्याला केवळ शिकवले नाही तर प्रेम आणि प्रेरणा देखील दिली. कुटुंब आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या बळावरच त्या महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या आपल्या गावातील पहिली मुलगी ठरल्या. त्यांनी सांगितले की, आयुष्यात जे काही मिळवले त्याबद्दल आपण नेहमीच आपल्या शिक्षकांच्या ऋणी आहोत.

मातृभाषेतील शिक्षण हा विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता शोधण्याच्या प्रक्रियेतला महत्त्वाचा टप्पा आहे आणि नव्या शैक्षणिक धोरणात यावर भर देण्यात आल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. मातृभाषेतल्या शिक्षणामुळं विज्ञान, साहित्य, सामाजिक शास्त्र या विषयांच्या अभ्यासात विद्यार्थ्यांना अधिक गती येतं असंही त्यांनी सांगितलं.

शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना शालेय विषय शिकवत नाही तर त्यांना आयुष्यातल्या आव्हानांचं सामना कसा करायचा हे देखील शिकवतात, असंही त्या म्हणाल्या. नवी दिल्लीत शिक्षक दिनी देशातल्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त ४६ शिक्षकांच्या सत्कारानंतर त्या बोलत होत्या.

यावेळी बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्याच्या दामु नाईक तांडा इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक शशिकांत कुलथे आणि बीड मधल्याच पारगाव जोगेश्वरी इथल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ वाळके यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला. मुंबईतल्या छत्रभूज नरसी मेमोरियल स्कूलच्या मुख्याध्यापिका कविता संघवी यांनाही राष्ट्रपतींनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरवलं.

विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची आणि शंका व्यक्त करण्याची सवय लावावी, असे आवाहन राष्ट्रपतींनी शिक्षकांना केले. विद्यार्थ्यांच्या अधिकाधिक प्रश्नांची उत्तरे देऊन सर्व शंकांचे निरसन केल्यास त्यांच्या ज्ञानातही भर पडेल. एक चांगला शिक्षक नेहमी काहीतरी नवीन शिकण्यासाठी उत्साही असतो, असेही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी संवाद साधणार आहेत.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *