Pune Nashik High-Speed Railway will lead to a comprehensive development of farmers and industrial estate – MP Dr Amol Kolhe
पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मुळे शेतकरी व औद्योगिक वसाहतीचा सर्वांगीण विकास होईल
– खासदार डॉ अमोल कोल्हे
सलग दुसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल खासदार डॉ अमोल कोल्हे यांचा सत्कार
हडपसर : केंद्र सरकारच्या माध्यमातून शिरूर लोकसभा मतदारसंघात तब्बल 22 हजार कोटीची रस्ते महामार्गासाठी निधी मंजूर झाला असून पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मंजूर झाल्याने शेतकरी व औद्योगिक वसाहतीचा सर्वांगीण विकास होईल असे प्रतिपादन शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
सलग दुसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, माजी महापौर वैशाली बनकर, माजी उपमाहापौर निलेश मगर, राष्ट्रवादी हडपसर विधानसभा निरीक्षक अॅडव्होकेट औदुंबर खुणे पाटील, जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुले, हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ.शंतनु जगदाळे, कार्याध्यक्ष अमर तुपे, महिला अध्यक्ष पूनम पाटील, माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष वासंती काकडे, माजी नगरसेवक शिवाजी पवार, योगेश ससाणे, अशोक कांबळे, फारूख इनामदार,संजीवनी जाधव, कलेश्वर घुले, जतीन कांबळे,शीतल संजय शिंदे,शिवाजी खलसे, मंगेश मोरे, राहुल घुले, वैष्णवी सातव,स्वाती चिटणीस, दिपाली कवडे, पियूष मोहिते, विक्रम जाधव, लालासाहेब खलाटे, आदिसह राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर विधानसभा मतदारसंघाचे पदाधिकारी वा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मतदारसंघातील विकास कामांसाठी संसदेत आवाज उठविला मतदार संघासाठी भरीव निधी आणला या निधीतून मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत दुसऱ्यांदा संसद रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने त्यांचा सन्मान केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सुरेश अण्णा घुले यांनी सांगितले.
सत्कार समारंभाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे कार्याध्यक्ष अमर तुपे यांनी केले होते.
प्रास्ताविक करून अमर तुपे यांनी आभार मानले.
Hadapsar News
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com