MP Udayanraje Bhosale’s demand to remove Governor Bhagat Singh Koshyari from office
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरुन हटवण्याची खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी
सातारा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचं प्रकरण आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत गेलंय.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरुन हटवण्याची मागणी, भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. ते आज सातारा इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर आश्चर्य वाटत असल्याचं ते यावेळी म्हणाले. एका पक्षाचा खासदार नव्हे तर एक शिवभक्त म्हणून मी ही पत्रकार परिषद घेत आहे.
राज्यपालांकडून शिवरायांच्या विचारांचा अवमान होत असताना शरद पवार आणि नितीन गडकरी त्याच व्यासपीठावर होते. तरीही त्यांनी निषेध का केला नाही, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी केला.
पहिले वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आहे आणि दुसरे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचे. या दोघांचाही मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध करत असल्याचं उदयनराजे म्हणाले.
आदर्श भारताची संकल्पना मांडणाऱ्या शिवाजी महाराजांचे विचार जुने कसे, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना यासंदर्भात पत्रं लिहीलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com