MoU with JAICA for beautification of station premises of line
मुंबई – अहमदाबाद द्रुतगती रेल्वे मार्गाच्या स्थानकांच्या परिसर सुशोभिकरणासाठी जायकासोबत सामंजस्य करार
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय तसेच रेल्वे मंत्रालयाने स्मार्ट प्रकल्पासाठी जायकासोबत केला संयुक्त करार
नवी दिल्ली: गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाने संयुक्तपणे जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी -जायका (JICA) सोबत ‘मुंबई-अहमदाबाद शीघ्रगती रेल्वेसह स्थानक क्षेत्र विकास’ (प्रोजेक्ट-SMART) साठी सामंजस्य करार केला आहे.
स्मार्ट या प्रकल्पांतर्गत मुंबई – अहमदाबाद शीघ्रगती रेल्वेस्थानकांच्या ( MAHSR) आसपासचा परिसर विकसित करण्यासाठी प्रवाशांची आणि इतर भागधारकांची सुलभता आणि सुविधा वाढवणे तसेच स्थानकाच्या आसपासच्या अर्थकारणाला चालना देण्यासाठी काम केले जाते. या प्रकल्पामुळे, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहर विकास प्राधिकरणे, यांची MAHSR स्थानाकांच्या आसपासच्या परिसराच्या विकासाची क्षमता वाढवणे, हा परिसर विकसित करणे आणि त्याचे व्यवस्थापन करण्याची संस्थात्मक क्षमता वाढू शकेल.
या प्रकल्पांमुळे स्थानकांच्या आसपासच्या क्षेत्रांचे नियोजन, विकास आणि व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकारं, महानगरपालिका आणि नागरी विकास प्राधिकरणांची संस्थात्मक क्षमता वृद्धींगत करेल.
गुजरातमधल्या साबरमती, सुरत आणि महाराष्ट्रातल्या विरार आणि ठाणे या चार स्थानकांसाठी हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. या मार्गातल्या १२ स्थानकांपैकी. सुरत, विरार आणि ठाणे हे हरित क्षेत्र आहे तर साबरमती हे तपकिरी क्षेत्र विकास आहे.
MAHSR, गुजरात, महाराष्ट्र आणि JICA तर्फे दिल्ली, अहमदाबाद आणि मुंबई इथं स्मार्ट प्रकल्पासाठी अनेक परिषदा आणि भेटींचं आयोजन केलं जाणार आहे. आज नवी दिल्ली इथल्या निर्माण भवन इथं या संदर्भातला पहिला परिसंवाद आयोजित करण्यात आला होता; ज्यात जपान दूतावासातले अधिकारी आणि अन्य तज्ञांनी चर्चा केली. या परिषदेत साबरमती, सुरत, विरार आणि ठाणे स्थानकांसाठीचा विकास आराखडा तयार करण्यावर विशेष भर देण्यात आला.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com