The initiative of ‘Mumbai Metaverse’ will show citizens a vision of a changing Mumbai
‘मुंबई मेटाव्हर्स’चा उपक्रम नागरिकांना बदलत्या मुंबईचे दर्शन घडवेल
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘मुंबई मेटाव्हर्स’ प्रकल्पाचे सादरीकरण
मुंबई : मुंबई बदलत असून ‘मुंबई मेटाव्हर्स’चा उपक्रम नागरिकांना बदलत्या मुंबईचे विलोभनीय दर्शन घडवेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे ‘मुंबई मेटाव्हर्स’ प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.
मुंबईतील विविध विकास प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर ते दृश्य स्वरूपात कसे असतील, त्यांचा एकत्रित परिणाम कसा असेल याबाबतचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई बदलते आहे. मुंबई महानगराचे सौंदर्य वाढविण्यासाठी आणि संपूर्ण मुंबई अधिक दर्शनीय करण्याच्या दृष्टीने मुंबई सुशोभीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. स्वच्छ, सुंदर आणि निरोगी मुंबई साकारायची आहे. यातील अनेक प्रकल्प आकारास येत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘मुंबई मेटाव्हर्स’चा उपक्रम नागरिकांना बदलत्या मुंबईचे विलोभनीय दर्शन घडवेल व याव्दारे नागरिकही विकासकामांत सक्रियपणे सहभागी होऊ शकतील, असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.
नागरिकांनाही याचा अनुभव घेता येईल यादृष्टीने प्रकल्पाची आखणी करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com