अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मुरजी पटेल आणि ऋतुजा लटके यांचे उमेदवारी अर्ज दाखल

Elections हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News. Hadapsar News

Murji Patel and Rituja Latke have filed nomination papers for the by-election in Andheri East Assembly Constituency

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी मुरजी पटेल आणि ऋतुजा लटके यांचे उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई : मुंबईत अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.Elections हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News. Hadapsar News

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या गटानं शिवसेनेच्या नेतृत्वाविरोधात गेल्या जून महिन्यात पुकारलेल्या बंडा नंतर, या पोटनिवडणुकीत शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा गट पहिल्यांदाच एकमेकांविरोधात लढणार आहेत.

यावेळी दोन्ही बाजुंनी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. लटके आणि मुरजी यांचे उमेदवारी अर्ज दाखल करताना दोन्ही बाजूंचे बडे नेते शक्तीप्रदर्शनात सहभागी झाले होते. साहजिकच यावेळी ठाकरे गट आणि भाजप दोन्ही बाजूच्या नेत्यांना प्रतिस्पर्ध्यांना दंड थोपटून दाखवले.

शिवसेना ठाकरे गटानं या निवडणुकीत ऋतुजा लटके यांना आपल्या पक्षाची उमेदवारी दिली आहे. त्यांचे पती रमेश लटके यांचा गेल्या मे महिन्यात मृत्यू झाल्यानं अंधेरी विधानसभा मतदारसंघाचं हे पद रिक्त झालं होतं.

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेनं ऋतुजा लटके यांना त्यांचा राजीनामा स्वीकारल्याचं पत्र आज दिलं. त्या मुंबई महापालिकेत लिपिक पदावर कार्यरत होत्या. महापालिकेनं आपला राजीनामा स्वीकारावा, यासाठी ऋतुजा लटके यांनी १२ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई महापालिकेनं लटके यांचा राजीनामा स्वीकारला.

या पार्श्वभूमीवर अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या जागेसाठी आजपर्यंत तीन उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. यामध्ये दोन अपक्ष उमेदवारांसह क्रांतीकारी जय हिंद सेना आणि हिंदुस्तान जनता पार्टी यांनी संयुक्तरीत्या एक उमेदवार दिला आहे. त्यामुळे अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बहुरंगी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

३ नोव्हेंबरला अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मतदान होईल. तर ६ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होईल.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *