Eligibility Platform for Alumni: ‘My Alumni Network’ App
माजी विद्यार्थ्यांसाठी हक्काचे व्यासपीठ : ‘ माय अल्यूमिनाय नेटवर्क ‘ ॲप
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात माजी विद्यार्थ्यांसाठी ॲल्युमिनाय असोसिएशनच्या वतीने “माय अल्युमनाय नेटवर्क” या मोबाईल ॲपचे लॉन्चिंग
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात माजी विद्यार्थ्यांसाठी ॲल्युमिनाय असोसिएशनच्या वतीने “माय अल्युमनाय नेटवर्क” या मोबाईल ॲपचे लॉन्चिंग विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघटनेने (माय अल्युमनाय नेटवर्क) हे ॲप विकसित केलेले असून या ॲप च्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांशी सहजरीत्या संवाद साधता येईल.
“माय अल्युमनाय नेटवर्क” या ॲप द्वारे तुम्हाला माजी विद्यार्थ्यांच्या नेटवर्कमध्ये नाव नोंदवता येते. या ॲपच्या माध्यमातून विद्यापीठाशी तुम्ही जोडले जाताच शिवाय तुम्हाला, नोकरीसाठी अर्ज करणेही शक्य होते.
आठवणी, जुने मित्र यांसाठी हे हक्काचे व्यासपीठ असेल. विद्यापीठातील शैक्षणिक चालू घडामोडीशी माहिती मिळत राहील. या ॲप लॉन्चिंग कार्यक्रमावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विद्यापीठाचे सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, बागेश्री मंठाळकर, अधिसभा सदस्य प्रसेनजीत फडणवीस, राहुल पाखरे, माजी विद्यार्थी संघाचे संचालक डॉ.संजय ढोले, आदी यावेळी उपस्थित होते. माजी विद्यार्थी संघाचे संपर्क अधिकारी प्रतीक दामा यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
सदर ॲप Andriod व ios Play Store वरती उपलब्ध आहे. Link – http://alumni.unipune.ac.in/mobileapp
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com