समृद्धी महामार्गावरून उद्यापासून नागपूर-शिर्डी बस सेवा सुरू होणार

Shirdi-Sai Baba

Nagpur-Shirdi bus service will start from Samriddhi highway from tomorrow

समृद्धी महामार्गावरून उद्यापासून नागपूर-शिर्डी बस सेवा सुरू होणार

समृध्दी महामार्गावरुन एसटीची नागपूर ते शिर्डी शयन आसनी बससेवा उद्यापासून सुरू होणार आहे

नागपूर : महाराष्ट्राच्या समृद्धीचा मार्ग असं म्हटलं जाणाऱ्या नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावरून आता वेगवान प्रवास करता येणार आहे.Shirdi-Sai Baba

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यातील मार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. हा टप्पा ५७० किलोमीटरचा असून समृद्धी महामार्गात नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, नगर, नाशिक आणि ठाणे अशा १० जिल्ह्यांचा समावेश आहे.

समृध्दी महामार्गावरुन एसटीची नागपूर ते शिर्डी शयन आसनी बससेवा उद्यापासून सुरू होणार आहे. ही बस नागपूर आणि शिर्डी या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री ९ वाजता सुटेल आणि पहाटे साडेपाच वाजता संभाव्य ठिकाणी पोहोचेल.

ही विशेष बस नागपुरातील गणेशपेठ बसस्थानक (Ganeshpeth Bus Stand Nagpur) येथून दररोज रात्री नऊ वाजता निघणार असून पहाटे साडेपाच वाजता शिर्डी येथे पोहोचणार आहे. तसेच शिर्डी (Shirdi) येथूनही बस रात्री नऊ वाजता निघून पहाटे साडेपाच वाजता नागपुरात (Nagpur) दाखल होणार आहे.

या बसमध्ये प्रवाशांना २X१ पद्धतीची ३० आसने (पुशबॅक पद्धतीची) बसण्यासाठी उपलब्ध असून १५ शयन आसने (Sleeper) आहेत.

या बससेवेमुळे प्रवाशांच्या सध्याच्या प्रवास अंतरात १०२ किलोमीटरची, तर वेळेमध्ये सव्वा चार तासांची बचत होणार आहे. या बससेवेसाठी प्रति प्रौढ व्यक्ति १ हजार ३००, तर लहान मुलांसाठी ६७० रुपये भाडं आकारलं जाणार आहे. तसेच ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना तिकिट दरात १०० टक्के मोफत तर ६५ ते ७५ दरम्यानच्या ज्येष्ठांना ५० टक्के सवलत असणार आहे.

याबरोबरच नागपूर ते औरंगाबाद या मार्गावरही समृध्दी महामार्गाद्वारे शयन आसनी बससेवा सुरू होत आहे. प्रवाशांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असं आवाहन एसटी महामंडळानं केलं आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *