नागपूर ते पुणे प्रवास आठ तासात शक्य होणार

Union Transport Minister Nitin Gadkari केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हडपसर मराठी बातम्या , Hadapsar Latest News, Hadapsar News

Nagpur to Pune journey will be possible in eight hours

नागपूर ते पुणे प्रवास आठ तासात शक्य होणार

Union Transport Minister Nitin Gadkari केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हडपसर मराठी बातम्या , Hadapsar Latest News, Hadapsar News
File Photo

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुणे-नागपूर प्रवासातील वेळ कमी करण्यासाठी एक महत्त्वाची घोषणा केली. नागपूर ते पुणे प्रवास आठ तासात शक्य होणार असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

त्यासाठी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला औरंगाबादजवळ नवीन प्रस्तावित पुणे-औरंगाबाद एक्सेस कंट्रोल ग्रीन एक्सप्रेस वे नं जोडला जाईल, असं ट्विट गडकरी यांनी केलं आहे. एक्स्प्रेस वे जोडणीमुळे पुण्यावरून नागपूरला किंवा नागपूरवरून पुण्याला आठ तासांत पोहोचणं शक्य होईल, असं नितीन गडकरींनी म्हटलंय.

औरंगाबाद-पुणे या शहरांना जोडणारा स्वतंत्र एक्स्प्रेस वे उभारण्यात येणार

नागपूर-पुणे अंतर कमी करण्यासाठी पुणे ते छत्रपती संभाजीनगर असा नवा मार्ग तयार केला जाणार आहे. पुणे ते औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) एक्सेस कंट्रोल ग्रीन एक्सप्रेस वे तयार करून तो औरंगाबादजवळ समृद्धी मार्गाला जोडला जाणार आहे.

या महामार्गामुळे पुणे ते औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) प्रवास अडीच तासांत आणि पुढे समृद्धी महामार्गावरून नागपूर-औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) प्रवास साडेपाच तासांत करणं शक्य होणार आहे. त्यामुळे नागपूर ते पुणे प्रवासासाठी हा मार्ग झाल्यानंतर आठ तासात वेळ लागेल, असं गडकरींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे

औरंगाबाद-अहमदनगर-पुणे महामार्गावरील वाहनांची रहदारी वाढली असून, त्यामुळे औरंगाबाद-पुणे या शहरांना जोडणारा स्वतंत्र एक्स्प्रेस वे उभारण्यात येणार आहे. Aurangabad-Pune expressway हा २६८ किमी लांबीचा असणार आहे. पुणे, अहमदनगर, बीड आणि औरंगाबाद अशा चार जिल्ह्यांतून हा जलदगती महामार्ग जाणार आहे.

हा महामार्ग न्हाई अर्थात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे संपूर्ण नवीन अलाईंटमेंट घेऊन तयार केला जाईल. त्यामुळे पुणे-औरंगाबाद प्रवास अडीच तासात, आणि समृद्धी महामार्गाद्वारे औरंगाबाद- नागपूर प्रवास साडेपाच तासात शक्य होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *