समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी रस्त्याचे लवकरच लोकार्पण

Chief Minister Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Nagpur to Shirdi road of Samriddhi Highway to be inaugurated soon

समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी रस्त्याचे लवकरच लोकार्पण

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भंडारा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भंडारा जिल्ह्याच्या महत्त्वकांक्षी गोसे धरणाला भेट दिली आहे. सिंचनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाकांक्षी असलेल्या या धरणावर पर्यटनाच्या दृष्टीने गोसेखुर्द जल पर्यटन केले जाणार आहे, याची पाहणी आणि सादरीकरणासाठी उपस्थित होते.

Chief Minister Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
File Photo

तसेच गोसे धरणाची पाहणी त्यांनी यावेळी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्दोग मंत्री उदय सावंत ही यावेळी उपस्थित होते. या प्रकल्पामुळे ७०० गावे ओलीताखाली येतील तसच या प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळेल असं त्यांनी सांगितल दरम्यान त्याआधी प्रधानमंत्री आणि गृहमंत्री यांच्या नेतृत्वात राज्यातील २२५ विकास प्रकल्पांसाठी २ लाख कोटी रुपये मान्य झाले आहेत.

राज्य सरकार उद्योगांना चालना देण्यावर, प्रलंबित प्रकल्पांना पुढे घेऊन जाण्यावर भर देत आहे. प्रत्येक प्रकल्पाचे वॉर रुमच्या माध्यमातून निरिक्षण आणि आढावा घेतला जात आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर मध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं.

समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी रस्त्याचे बांधकाम पुर्ण झाले असून लवकरच त्याच लोकार्पण होईल असही शिंदे यांनी स्पष्ट केल. खासदार गजानन कीर्तिकर बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल झाल्यानं त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला निश्चित होईल असं त्यांनी सांगितलं.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *