Narcotics worth more than 1 thousand 476 rupees seized from a cargo truck in Navi Mumbai
नवी मुंबईत मालवाहू ट्रकमधून १ हजार ४७६ रुपयांहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जप्त
मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयानं काल नवी मुंबईत एका मालवाहू ट्रकमध्ये वाहून नेले जाणारे १ हजार ४७६ रुपयांहून अधिक किमतीचे मेथामफेटामाइन आणि कोकेन जप्त केले असून ही जप्ती प्रतिबंधित अमली पदार्थांची देशभरातली सगळ्यात मोठी जप्ती आहे.
वाशी येथील महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी शनिवारी संत्र्याच्या पेटीतून 1,476 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले.
जप्त केलेल्या अंमली पदार्थांमध्ये १९८ किलो मेथामफेटामाइन आणि ९ किलो कोकेन समाविष्ट आहे. हे पदार्थ परदेशातून आयात केलेल्या संत्र्यांची वाहतूक करणाऱ्या एका मालवाहू ट्रक मध्ये दडवलेले होते. संबंधित संत्री आयात करणाऱ्या इसमाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोट्यवधी रुपयांच्या औषध साठ्याची तस्करी होत असल्याची माहिती मुंबई महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सापळा रचला.
संशयित ट्रक वाशीजवळ येताच त्याला थांबवण्यात आले. संशयित ट्रकच्या तपासणीत असे दिसून आले की “व्हॅलेन्सिया संत्री घेऊन जाणाऱ्या एका काड्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ लपवून ठेवण्यात आले होते.
संत्र्यांनी भरलेल्या ट्रकमध्ये लपवून ठेवलेले 198 किलो उच्च शुद्धता क्रिस्टल मेथॅम्फेटामाइन (बर्फ) आणि 1,476 कोटी रुपयांचे 9 किलो उच्च शुद्ध कोकेन जप्त करण्यात आले आहे. माल आयात करणाऱ्याला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. पुढील तपास सुरू आहे,” डीआयडी सूत्रांनी सांगितले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com