If Narendra Dabholkar murder case is heard fast, then the case will be settled in 2 months – CBI
नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणाची सुनावणी जलदगतीनं झाली, तर हा खटला २ महिन्यात निकाली निघेल
– केंद्रीय अन्वेषण विभाग
मुंबई : नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणाची सुनावणी जलदगतीनं झाली, तर हा खटला दोन महिन्यात निकाली निघेल, असं केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय)आज सांगितलं. या खटल्याच्या निर्णयाला बराच वेळ लागणार असल्यानं आपली जामिनावर सुटका व्हावी, अशी विनंती करणारा अर्ज या प्रकरणातला प्रमुख आरोपी विरेंद्र तावडे यानं केला आहे. त्यावर सीबीआयचे वकील संदेश पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयापुढं हे म्हणणं मांडलं.
या प्रकरणातल्या ३२ साक्षिदारांपैकी ८ साक्षिदारांची तपासणी बाकी आहे. त्यासाठी फार वेळ लागणार नाही. एकही साक्षिदार उलटलेला नाही. त्यामुळे हा खटला लवकर निकाली निघू शकेल, असं त्यांनी न्यायालयाला सांगितलं. मात्र तावडेच्या वकिलांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यावर त्यांना आवश्यक कागदपत्रं सादर करायला सांगत न्यायालयानं सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com