Narendra Modi govt at center misuses all government machinery to eliminate opposition – Nana Patole alleges
केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार विरोधकांना संपवण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करतं – नाना पटोले यांचा आरोप
मुंबई: केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार विरोधकांना संपवण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. सरकारच्या या दहपशाहीच्या विरोधात काँग्रेस येत्या मंगळवारी पुन्हा एकदा शांततापूर्ण सत्याग्रह करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. २६ जुलैला मंत्रालयाजवळ गांधीजींच्या पुतळ्यासमोर सकाळी १० वाजता सत्याग्रह केला जाणार असून, जोपर्यंत सोनिया गांधी यांना ईडी चौकशीतून मुक्त केलं जात नाही तोपर्यंत सत्याग्रह सुरुच राहील, असं ते म्हणाले.
या शांततापूर्ण सत्याग्रहामध्ये पटोले यांच्यासह, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधीमंडळ काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात, इतर नेते, आणि पदाधिकारीही सहभाही होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com