प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या समृद्धी महामार्गासह विविध विकासकामाचं लोकार्पण

Prime Minister Narendra Modi will inaugurate Samriddhi Highway tomorrow प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या समृद्धी महामार्गाचे उदघाटन हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Prime Minister Narendra Modi will inaugurate various development works including Samriddhi Highway tomorrow

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या रविवार दिनांक ११ डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गासह विविध विकासकामाचं लोकार्पण

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते उद्या  रविवार दिनांक ११ डिसेंबर रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण होणार आहे.Prime Minister Narendra Modi will inaugurate Samriddhi Highway tomorrow प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या समृद्धी महामार्गाचे उदघाटन हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

नागपूरहून मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाची एकूण लांबी ७०१ किलोमीटर असून यामुळं नागपूर – मुंबई अंतर ८ तासात पार करता येणार आहे. हा ६ पदरी द्रुतगती महामार्ग 10 जिल्हे, 26 तालुके आणि आसपासच्या 392 गावांना जोडणार आहे. देशातल्या या सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड महामार्गाच्या दोन्ही बाजूने सुमारे ११ लाख ३१ हजार वृक्षांची लागवड होणार आहे.

महामार्गावर प्रत्येकी ५ किलोमीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि मोफत दूरध्वनी सेवाही देण्यात आली आहे. काही ठिकाणी वीजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्सही असणार आहेत. विशेष म्हणजे, समृद्धी महामार्गावर निर्गमन पथकर पद्धतीनुसार समृद्धी महामार्गावर जेवढ्या अंतराचा प्रवास होईल, तेवढाच पथकर आकारण्यात येणार आहे.

सध्या नागपूर ते शिर्डी या अंतरासाठी सुमारे 900 रुपये पथकर द्यावा लागेल. पथकर हा फास्ट टॅग, कार्ड, वॅालेट, रोख अथवा ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डी दरम्यान मुख्य मार्गिकेवर फक्त वायफळ इथं पथकर नाका आहे. इतर इंटरचेंजेस धरून एकूण 19 नाके आहेत. प्रवाशांच्या मदतीसाठी महामार्गावर १५ रुग्णवाहिका, १५ शीघ्र प्रतिसाद वाहनं, १२२ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत.

याशिवाय नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला प्रधानमंत्री हिरवा झेंडा दाखवतील. तसंच नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पण आणि नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं भूमीपूजनही त्यांच्या हस्ते होणार आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्या नागपूरच्या एम्सचं लोकार्पणही होणार आहे. त्यानंतर प्रधानमंत्री पंधराशे कोटींच्या रेल्वे प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करतील.

नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ वन हेल्थ आणि नाग नदी प्रदुषण मुक्त करण्याच्या प्रकल्पांचं भूमीपूजनही प्रधानमंत्री करणार आहेत. चंद्रपुरातल्या पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी तसंच हिमो-ग्लोबिनो-पॅथी क्षेत्रातल्या संशोधन संस्थेचं लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. ही संस्था असाध्य रोगांवर उपचारासाठी तयारी आणि प्रयोगशाळेची क्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे.

उद्या संध्याकाळी प्रधानमंत्री गोव्यात मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करणार असून ९ व्या जागतिक आयुर्वेद परिषदेत सहभागी होणार आहेत.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *