राष्ट्रीय नागरिक नोंदपुस्तिका तयार करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण

The Central Government clarified that no decision has been taken regarding the preparation of the National Citizen Register

राष्ट्रीय नागरिक नोंदपुस्तिका तयार करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली : राष्ट्रीय भारतीय नागरिक नोंदपुस्तिका तयार करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरातHome State Minister Nityanand Rai. ही माहिती दिली. आसाममधे राष्ट्रीय नागरिक नोंद पुस्तिकेतल्या समाविष्ट आणि वगळलेल्या नावांची पुरवणी यादी ऑगस्ट २०१९ मधे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांवरुन प्रसिद्ध केली होती, असं त्यांनी सांगितलं.

ऑक्सफॅम इंडिया या स्वयंसेवी संस्थेची नोंदणी परदेशी योगदान नियंत्रक कायद्यातल्या तरतुदींनुसार रद्द केल्याचंही राय यांनी एका लेखी उत्तरातून स्पष्ट केलं. हा निर्णय मागं घेण्याची मागणी करणारा अर्ज ऑक्सफॅम इंडीयाने दाखल केला असून या संदर्भात युके सरकारबरोबरच्या द्विपक्षीय बैठकीत चर्चा झाली आहे असं राय यांनी म्हटलं आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत २०२१ च्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना चार हजार तीनशे तीन कोटी रुपये दिल्याची माहिती कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत दिली.
सुमारे  ७४ लाख ५० शेतकऱ्यांना विमा दाव्याचा भाग म्हणून ही रक्कम दिल्याचं त्यांनी सांगितलं. याआधी विमा कंपन्यांनी या योजनेअंतर्गत २०२१-२२ चा हप्ता म्हणून ३ हजार ४७६ कोटी रुपये  जमा केले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *