National security is a top priority and the Indian Army will be able to meet all future challenges efficiently: Army Chief Manoj Pandey
देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असून भविष्यातल्या सर्व आव्हानांना भारतीय लष्कर सक्षमपणे सामोरं जाईल- लष्करप्रमुख मनोज पांडे
नवी दिल्ली : देशाच्या सुरक्षेला कायमच सर्वोच्च प्राधान्य दिलं जाईल. तसंच भविष्यातील सर्व आव्हानांना भारतीय लष्कर सक्षमपणं सामोर जाईल, असा विश्वास लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी व्यक्त केला आहे.
नवी दिल्लीतील साऊथ ब्लॉक इथं आज सकाळी आयोजित कार्यक्रमात लष्करप्रमुख मनोज पांडे यांना मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमानंतर लष्करप्रमुखांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जगातील भौगोलिक आणि राजकीय परिस्थिती वेगानं बदत चालली आहे. त्या सर्व बदलांकडं भारतीय लष्कर बारकाईनं लक्ष ठेवून आहे.
तसंच या बदलांमुळे येणाऱ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी तिन्ही संरक्षण दलं सज्ज आहेत. त्यासाठी लष्कर, हवाई दल आणि नौदलाशी आवश्यक तो योग्य समन्वय राखला जाईल. भारतीय लष्कराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी योग्य ते आणि आवश्यक असे बदल करण्यावर विशेष लक्ष दिलं जाईल, असंही लष्करप्रमुख पांडे यांनी यावेळी सांगितलं.या कार्यक्रमाला हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी, नौदलप्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार उपस्थित होते.
हडपसर न्युज ब्युरो