राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विद्यापीठात “चला खेळ खेळूया” उपक्रमाचे आयोजन

Savitribai Phule Pune University, Hadapsar News, Hadapsar Latest News,हडपसर मराठी बातम्या

On the occasion of National Sports Day, “Let’s play sports” activity was organized in the university

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विद्यापीठात “चला खेळ खेळूया” उपक्रमाचे आयोजन

पुणे : हॉकीचे जादुगार कै. श्री. मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी २९ ऑगस्ट हा “राष्ट्रीय क्रीडा दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारामध्ये मा. कुलगुरू डॉ. कारभारी काळे, मा. प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे तसेच मा. अध्यक्ष, क्रीडा संकुल समिती श्री. राजेश पांडे यांचे संकल्पनेतून साकार झालेले “चला खेळ खेळूया” या उपक्रमाचे आयोजन सोमवार, दि. २९ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता खाशाबा जाधव क्रीडा संकुलातील इनडोअर हॉलमध्ये सर्व व्यवस्थापन परिषद सदस्य व विद्यापीठ अधिकार मंडळाचे पदाधिकारी तसेच क्रीडा क्षेत्रातील नामवंत खेळाडू, क्रीडा संघटक यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.Savitribai Phule Pune University

एकूण २७ एकर क्षेत्रात क्रीडा संकुलाची निर्मिती झाली असून, त्या ठिकाणी उपलब्ध क्रीडा सुविधा व अत्याधुनिक क्रीडा साहित्य यांचे शालेय विद्यार्थ्यांना माहिती व ती हाताळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या उपक्रमामध्ये पुणे महानगरपालिका शाळेतील अंदाजे २५०० शालेय विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या उप्रकमाअंतर्गत विद्यार्थ्यांना झुंबा, योगा, कबड्डी, फुटबॉल, बास्केटबॉल, लॉन टेनिस, कुस्ती, शुटींग, जिमन्यॅशियम, अॅथलेटिक अॅक्टीव्हिटी असे मैदानी खेळ खेळता येणार आहेत. यानिमित्ताने प्रथमच कबड्डी (मुली) व फुटबॉल (मुले) या खेळांच्या आमंत्रित आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे सुध्दा आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धा पाहण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे. या उपक्रमासाठी आलेल्या विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व इतरांचे Fat Percentage & BMI तपासणी शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना खेळाविषयी गोडी निर्माण होवून विविध खेळ खेळण्यास उत्तेजन मिळेल व भावी काळात चांगले खेळाडू निर्माण होतील. सदर क्रीडा दिनी पुणे शहर परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. दिपक माने, संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ यांनी केले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *