National Startup Week 2023 organized by Savitribai Phule Pune University
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने नॅशनल स्टार्टअप सप्ताह २०२३
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने SPPU रिसर्च पार्क फौंडेशन व नवोपक्रम, नवसंशोधन व उपक्रम केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १५ जानेवारी २०२३ रोजी नवउद्योजक सक्षमीकरण मार्गदर्शन तसेच नवउद्योजकांच्या उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित केले आहे.
कार्यक्रमाचे उदघाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. SPPU रिसर्च पार्क फौंडेशन चे CEO डॉ. अरविंद शाळीग्राम सर तसेच IEEE पुणे विभाग चे अध्यक्ष मा. श्री. गिरीश खिलारी सर व इतर मान्यवरांची या ठिकाणी व्याखाने होणार आहेत.
मा. पंतप्रधानानी नवउद्योजक निर्मिती करिता भारतातील काही नामांकित विद्यापीठाद्वारे नवउद्योजकांच्या सक्षमीकरणाचा उपक्रम हाती घेतलेला आहे. त्या उपक्रमाद्वारे SPPU रिसर्च पार्क फौंडेशन च्या वतीने नवउद्योजकांना तांत्रिक, संशोधनात्मक मार्गदर्शन व ते मदत केली जाते. ह्या उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनाचे प्रदर्शन दिनांक १५ जानेवारी २०२३ रोजी SPPU रिसर्च पार्क फौंडेशन, SPPU हेल्थ सेंटर समोर सकाळी १०:०० ते ०५:०० या वेळेत आयोजित करण्यात आले असून सदर प्रदर्शन हे सर्वांसाठी विनामूल्य व खुले राहणार आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com