Maharashtra awarded 3 National Water Awards
महाराष्ट्राला ३ राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान
साताऱ्यातील मलकापूर, जालन्यातील कडेगाव सह भारतीय जैन संघटनेस पुरस्कार
असा झाला कडेगाव चा कायापालट
मलकापूर नगर परिषदेतील २४x७ नळ पाणी पुरवठा ठरला पथदर्शी प्रकल्प
भारतीय जैन संघटनेस (बीजेएस) तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार
नवी दिल्ली: पाणी व्यवस्थापन, संवर्धन आणि पाण्याचा पुर्नवापर उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल राज्यातील सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगर परिषदेस, जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्राम पंचायतीला आणि भारतीय जैन संघटनेस उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते आज ४ थ्या राष्ट्रीय जल पुरस्काराने गौरविण्यात आले.
येथील विज्ञान भवनात केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने आज ४ थ्या राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय जल शक्ती राज्य मंत्री प्रल्हाद सिंह पटेल आणि विश्वेश्वर टुडू केंद्रीय सचिव पंकज कुमार उपस्थित होते.
कार्यक्रमात विविध श्रेणीत प्रथम आलेल्या राज्यांना, शहरांना, महानगर पालिकांना, नगर पालिकांना, ग्राम पंचायतींना उपराष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. द्वितीय आणि तृतीय क्रमांकांचे पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री. शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सन्मान चिन्ह, प्रमाण पत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
महाराष्ट्राला ३ राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान करण्यात आले. उत्कृष्ट ग्राम पंचायत पुरस्कार या श्रेणीमध्ये जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्राम पंचायतीला तिसरा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार सरपंच दत्तु निबांळकर, माजी सरपंच भीमराव जाधव आणि खरपूडी येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. एस.व्ही. सोनुने यांनी स्वीकारला. हा पुरस्कार मेघालय राज्यातील री भोई जिल्हा येथील मावकिर्देप या ग्राम पंचायती सोबत विभागून मिळालेला आहे.
असा झाला कडेगाव चा कायापालट
कडेगाव हे खरपुडी येथील कृषि विज्ञान केंद्राच्या अंतर्गत येते. राष्ट्रीय नाविन्यपूर्ण हवामान लवचिक कृषी कार्यक्रम (NICRA- National Innovative Climate Resilient Agriculture program) प्रकल्पा अंतर्गत 2015-16 मध्ये कडेगावाला दत्तक घेण्यात आले. या गावात भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शनानुसार विविध हवामान अनुकुल उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्यापैकी नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन या घटका अंतर्गत गावात सिमेंट नाल्याचे बांधकाम, बांधामधील गाळ काढणे, पाझर तलावातील गाळ काढणे, भूमिगत प्लास्टिक बंधारा बांधणे, कृत्रिम विहीर पुनर्भरण करणे, शेततळयातील गाळ काढणे, वाळूच्या गोण्या दाबून चेकडॅम बनविणे, भूमिगत प्लास्टिक बंधारे बांधणे असे उपक्रम हाती घेण्यात आले.
यासह कमी पाण्यावर येणारी पिके जसे तुती (रेशीम उद्योग), गव्हाऐवजी कमी पाण्यावर येणारी ज्वारी, हरभरा या पिकांना प्रोत्साहन देण्यात आले. कापूस आणि मूग, सोयाबीन आणि तूर अशा आंतरपीक पद्धतींना प्रोत्साहन देण्यात आले. सोयाबीन आणि हरभरा पिकांसाठी बीबीएफचा वापर करण्यात आला. कापूस पिकात ठिंबक सिंचनाचा वापर करण्यात आला. पाणलोट क्षेत्र आधारित उपक्रम – नवीन शेततळी, शेतीचे यांत्रिकीकरण याशिवाय विविध उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या क्षमता वाढविण्यात आल्या. या सर्वांचा परिणाम गावातील पाणी टंचाईवर पुर्णपूणे मात करण्यात आली. या राष्ट्रीय पुरस्कारामुळे कडेगावाची मोहर राष्ट्रीय पातळीवर उमटली.
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामधील मलकापूर या नगरपरिषदेस उत्कृष्ट नागरी स्थानिक संस्था या श्रेणीत तिसरा राष्ट्रीय पुरस्कार आज केंद्रीय मंत्री श्री. शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार नगराध्यक्ष निलम येडगे आणि उपनगराध्यक्ष, पाणीपुरवठा जलनिस्सारण व आरोग्य सभापती मनोहर शिंदे यांनी स्वीकारला. हा पुरस्कार सुरत महानगर पालिकेसह विभागून देण्यात आला.
मलकापूर नगर परिषदेतील २४x७ नळ पाणी पुरवठा ठरला पथदर्शी प्रकल्प
भारतीय जैन संघटनेस (बीजेएस) तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com