Nawab Malik’s bail application was rejected by the PMLA Special Court in Mumbai
नवाब मलिक यांचा जामीन अर्ज मुंबईतल्या पीएमएलए विशेष न्यायालयानं फेटाळला
मुंबई : मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांचा जामीन अर्ज मुंबईतल्या पीएमएलए विशेष न्यायालयानं आज फेटाळला. या प्रकरणी त्यांना फेब्रुवारीमधे ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं अटक केली होती.
प्रकृतीच्या कारणामुळे मलिकांवर मागील काही दिवसांपासून कुर्ल्यातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मलिक यांच्या जामीन न्यायमूर्ती रोकडे यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने फेब्रुवारीमध्ये अटक केली होती. कुर्ल्यातील एका मालमत्तेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मलिकला विविध कलमांखाली त्यांना अटक करण्यात आली आहे.
मात्र, मलिक यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते. ईडीने नवाब मलिक यांच्यावर टेरर फंडिंग आणि मनी लाँड्रिंगचे आरोप केले होते. मलिक यांचे अंडरवर्ल्डमधील लोकांशी संबंध असल्याचे सांगण्यात आले. कुर्ल्यातील गोवाला कंपाऊंडमध्ये त्यांनी शेकडो कोटींची जमीन एका पैशात खरेदी केल्याचे ईडीने म्हटले होते.
ईडीनं ही कारवाई करेपर्यंत आपल्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता, असं मलिक यांनी या जामीन अर्जात म्हटलं होतं. त्यांच्या जामीन अर्जाला ईडीनं तीव्र विरोध केला होता.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com