राष्ट्रीय स्तरावर कामगिरी करणाऱ्या एनसीसी कॅडेट सत्कार

NCC cadets who have performed at the national level are felicitated राष्ट्रीय स्तरावर कामगिरी करणाऱ्या एनसीसी कॅडेट सत्कार हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

NCC cadets who have performed at the national level are felicitated

राष्ट्रीय स्तरावर कामगिरी करणाऱ्या एनसीसी कॅडेट सत्कार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यक्रम संपन्नNCC cadets who have performed at the national level are felicitated
राष्ट्रीय स्तरावर कामगिरी करणाऱ्या एनसीसी कॅडेट सत्कार
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज 
Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एनसीसी युनिटच्या माध्यमातून विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व केलेल्या एनसीसीच्या कॅडेटचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, ग्रुप कमांडर ब्रिगेडियर अर्जुन मित्रा, डेप्युटी ग्रुप कमांडर, पुणे मुख्यालय कर्नल के.आर.शेखर, ट्रेनिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल अनिरुद्ध सिन्ह, कॅप्टन चंद्रशेखर चितळे, व्यवस्थापन परिषद सदस्य बागेश्री मंठाळकर, डॉ.गीता शिंदे, डॉ.हरिषचंद्र नवले, प्रा.बाबसाहेब दुधभाते आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिन शिबीर आणि थल सेना, वायू सेना, नौसेना आणि शूटिंग शिबिरात नेतृत्व केलेल्या जवळपास ९० कॅडेटचा सत्कार यावेळी करण्यात आला. विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी ३०० हून अधिक एनसीसी कॅडेट उपस्थित होते.

यावेळी ब्रिगेडियर अर्जुन मित्रा म्हणाले, देशाच्या भविष्यासाठी एनसीसी महत्त्वाची असून युवा वर्गाला राष्ट्रीय मुद्यांशी जोडण्यात एनसीसीचे योगदान आहे.

डॉ.संजीव सोनवणे म्हणाले, विद्यापीठाने आपल्या परिसंस्थेत एनसीसीचे युनिट सुरू केले आहे. त्यांच्यासाठी योग्य ते वातावरण देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. या माध्यमातून देशासाठी काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

डॉ.कारभारी काळे यांनी पाठवलेल्या लेखी शुभेच्छांबद्दल विद्यापीठाला एनसीसी युनिट दिल्याबद्दल संचालनालयाचा आभारी आहे. अत्यंत कमी वेळेत विद्यापीठातील युनिटने २६ जानेवारी व १० फेब्रुवारी रोजी उत्तम सादरीकरण केले त्यांचे अभिनंदन आणि सर्व कॅडेटना माझ्याकडून शुभेच्छा आहेत.

यावेळी कॅडेटसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे आभार एनसीसी युनिटचे केअर टेकर ऑफिसर आशिष सांगळे यांनी मानले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *