India wins one silver and four bronze medals on day 6 at CWG 2022
राष्ट्रकूल स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारताने जिंकली एक रौप्य आणि चार कांस्य पदके
नवी दिल्ली : राष्ट्रकूल स्पर्धेच्या सहाव्या दिवशी आज भारताने एक रौप्य आणि चार कांस्य पदके जिंकली आहेत.
लव्हप्रीत सिंग याने कांस्यपदक जिंकल्यानंतर, 78 किलो वजनी गटात ज्युदोत तुलिका मान हिने रौप्य पदक जिंकले. भारोत्तोलनपटू गुरदीप सिंग याने पुरूषांच्या 109 किलो वजनी गटात कांस्य पदक जिकले.
सौरव घोषाल याने कांस्य पदकाला गवसणी घातली तर तेजस्विन शंकर याने अॅथलेटिक्समध्ये उंच उडी या क्रीडाप्रकारात भारतासाठी पहिले पदक जिंकून इतिहास घडवला. भारताच्या पदकांची संख्या आता 5 सुवर्ण, 6 रौप्य आणि 7 कांस्यपदकांसह 18 वर गेली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर तसेच देशभरातून नागरिकांनी पदक विजेत्यांच्या अप्रतिम कामगिरीबद्द्ल अभिनंदन केले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तेजस्विन शंकर याचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे की, तेजस्विन शंकर याने कांस्य पदक जिंकण्याची उत्कृष्ट कामगिरी केली आहे. राष्ट्रकूल स्पर्धेत उंच उडीमध्ये पदक जिंकणारा तू पहिला भारतीय खेळाडू ठरल्याबद्दल अभिनंदन. राष्ट्राला वैभव प्राप्त करून देण्यासाठी तू अनुकरणीय असा निर्धार दाखवला आहे. पुढील कित्येक प्रेरणादायी विक्रमांबद्दल माझ्या शुभेच्छा.
तुलिकाच्या कामगिरीची प्रशंसा करताना राष्ट्रपतींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, तुलिका मान हिचे राष्ट्रकूल स्पर्धेत ज्युदोमध्ये लढाऊ वृत्तीने रौप्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन. तू तरूण वय़ातच यश मिळवण्यासाठी लक्षणीय धैर्य आणि जिंकण्याप्रती उत्कट भावनेचे प्रदर्शन केले आहेस. भविष्यातील स्पर्धांमध्ये तू आणखी उत्तरोत्तर बळकट होत जाशील आणि अधिक विजय साध्य करशील.
आणखी एका ट्विटमध्ये राष्ट्रपतीनी म्हटले आहे की, राष्ट्रकूल स्पर्धेत भारोत्तोलनमध्ये गुरदीप सिंग याचे उत्कृष्ट प्रयत्न आणि कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन. प्रतिष्ठेच्या स्पर्धेत तू ज्या आवेशाने वजन उचलून देशाला अभिमानास्पद बनवले आहे. येत्या काळात तू यशाची नवीन उंची गाठावी.
राष्ट्रपतींनी सौरवने कांस्यपदक जिंकल्याबद्दल त्याचेही अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे की, सौरव घोषालचे पुरूषांच्या एकेरी स्क्वॉश स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन. पुरूषांच्या एकेरी स्क्वॉशमध्ये पहिले पदक जिंकून तू नवीन विक्रम केला असून भारताला तुझा अभिमान आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्क्वॉश पटु सौरव घोषाल, ज्युदो पटु तुलिका मान, भारोत्तोलन पटु गुरदीप सिंग आणि तेजस्विन शंकर यांचे राष्ट्रकूल स्पर्धेत (2022) अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी तेजस्विन शंकर याचे भारताला उंच उडीमध्ये पहिले पदक जिंकून दिल्याबद्द्ल अभिनंदन केले आहे. तेजस्विन शंकर याचे उंच उडी या क्रीडाप्रकारातील कांस्य पदक हे राष्ट्रकूल स्पर्धेत (2022) ट्रॅक अँड फिल्ड या प्रकारातील पहिलेच पदक आहे. पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले आहे की, तेजस्विन शंकर याने इतिहास रचला आहे. त्याने राष्ट्रकूल स्पर्धेत उचं उडी या प्रकारात आमचे पहिले पदक जिंकले आहे. कांस्यपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. त्याच्या प्रयत्नांचा मला अभिमान आहे. त्याच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी माझ्या शुभेच्छा. तो असेच यश उत्तरोत्तर मिळवत राहो.
गुरदीप सिंग याचे अभिनंदन करताना पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की कठोर मेहनत आणि समर्पण भावना याची परिणती असामान्य परिणामांमध्ये होत असते. गुरदीप सिंगने राष्ट्रकूल 2022 भारोत्तोलनमध्ये कांस्यपदक जिंकून हेच दर्शवले आहे. आमच्या नागरिकांची आनंदाची भावना त्याने पुढे नेली आहे. त्याचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
आणखी एका ट्विटमध्ये पंतप्रधानांनी ज्युदो खेळाडू तुलिका मान हिचे अभिनंदन करताना म्हटले आहे की, तुलिका मान बर्मिंगहॅम स्पर्धेत चमकली आहे. ज्युदोमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्द्ल तिचे अभिनंदन. हे पदक तिच्या आतापर्यंतच्या उज्वल कारकिर्दीत आणखी एक प्रशंसनीय यश आहे. येत्या काळातील तिच्या प्रयत्नांबद्दल तिला शुभेच्छा.
सौरव घोषालचे अभिनंदन करताना पंतप्रधानांनी म्हटले आहे की सौरव घोषालने यशाची नवी उंची गाठल्याचे पाहणे आनंददायक आहे. बर्मिंगहॅममध्ये त्याने जिंकलेले कांस्यपदक हे अत्यंत विशेष आहे. त्याचे अभिनंदन. त्याच्या यशाने स्क्वॉश खेळाची लोकप्रियता भारतीय तरूणांमध्ये वाढण्याला चालना मिळण्यास मदत होवो.
केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनीही तेजस्विन याचे अभिनंदन करून ट्विट संदेशात म्हटले आहे की, भारतीय अॅथलिटला राष्ट्रकूल स्पर्धेत उंच उडीमध्ये पहिलेवहिले पदक जिंकले आहे त्याबद्दल अभिनंदन. राष्ट्रकूलमध्ये तू पहिलेवहिले पदक जिंकून इतिहास रचला आहेस त्याबद्दल तुझे अभिनंदन. हे कांस्यपदक सुवर्णपदकापेक्षाही विशेष आहे.
गुरदीप याचे अभिनंदन करताना क्रीडा मंत्र्यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे की, राष्ट्रकूल स्पर्धेत 2022 भारोत्तोलनमध्ये दहावे पदक भारतात आणल्याबद्दल गुरदीपचे अभिनंदन. भारताने पाठवलेले संपूर्ण खेळाडुंचे पथक प्रतिभाशाली आहे. एनएसएनआयएस पतियाळा जो अनेक दशकांपासून विजेत्यांना घडवणारे केंद्र आहे, तेथून आणखी एक पदक विजेता आला आहे आणि या आवृत्तीत त्याने राष्ट्रकूल स्पर्धेत भारतासाठी दहा पदके जिंकली आहेत.
आणखी एका ट्विट संदेशात ठाकूर यांनी म्हटले आहे की सौरव घोषालचे राष्ट्रकूल 2022 मध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन. तुझ्या पदकाने अनेक तरूणांना स्क्वॉशकडे वळण्याची प्रेरणा मिळेल. हा एक असा क्रीडाप्रकार आहे की ज्यातून भारताला अनेक विजेते तयार करता येतील आणि या खेळाच्या वाढीसाठी योग्य त्या पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी क्रीडा विभाग कटीबद्ध आहे.