India’s G-20 Presidency Working Group on Trade and Investment meeting in Mumbai
भारताच्या जी-२० अध्यक्षपदाची व्यापार आणि गुंतवणूकविषयक कार्यगटाची बैठक मुंबईत
भारताच्या जी-२० अध्यक्षपदाची व्यापार आणि गुंतवणूकविषयक कार्यगटाची पहिली बैठक २८ ते ३० मार्च दरम्यान मुंबईत
मुंबई : भारताच्या जी-२० अध्यक्षपदा अंतर्गत, व्यापार आणि गुंतवणूकविषयक कार्यगटाची पहिली बैठक येत्या २८ ते ३० मार्च दरम्यान मुंबईत होणार आहे. येत्या २९ मार्च रोजी, या बैठकीचं औपचारिक उद्घाटन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते होईल.
बैठकीच्या पहिल्या दिवशी, म्हणजे 28 मार्च रोजी, ‘व्यापार आणि वित्तीय सहकार्य” या विषयावर एक आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. व्यापार आणि वित्तपुरवठा यातील तफावत कमी करण्यासाठी, बँका, वित्तीय संस्था, विकास वित्तीय संस्था आणि निर्यात पतसंस्था यांची भूमिका, तसेच, डिजिटलीकरण आणि फीनटेक सोल्यूशन याद्वारे, व्यापारविषयक वित्तपुरवठ्याचे सहाय अधिकाधिक लोकांपर्यंत कसे पोहोचवता येईल, यावर या परिषदेतील दोन सत्रात सविस्तर चर्चा होईल. भारतातील तसेच, परदेशातील या क्षेत्रात नामवंत तज्ञांना या बैठकीत विचार मांडण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
आपल्या जी-२० अध्यक्षपदा अंतर्गत, जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीशी संबंधित ज्या प्राधान्यक्रमांचा भारत पाठपुरावा करत आहे, त्या संदर्भातल्या चार तंत्रज्ञानविषयक सत्रांमध्ये २९ आणि ३० मार्च रोजी चर्चा होईल.
या बैठकीत सहभागी होण्यासाठी, ५० पेक्षा जास्त प्रतिनिधी आज मुंबईत पोहोचले आहेत.परिषदेच्या पहिल्या सत्रात, व्यापार आणि अर्थपुरवठा, यामधली तफावत कमी करण्यात, बँका, वित्त संस्था, विकासविषयक वित्त पुरवठा संस्था आणि निर्यात हमी संस्था, अशा सगळ्या संस्थांची भूमिका अधोरेखित केली जाईल. तर दुसऱ्या सत्रात, डिजिटलीकरण आणि फीनटेक अर्थात आर्थिक व्यवहारात तंत्रज्ञानाचा वापर, याद्वारे, व्यापाराच्या अर्थपुरवठ्याला गती कशी मिळेल, या विषयावर विचार मंथन होईल.
जी-२० च्या व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या बैठकी दरम्यान, भारतीय चहा महामंडळ, भारतीय कॉफी महामंडळ, भारतीय मसाले महामंडळ यांनी तयार केलेला चहा, कॉफी, मसाले आणि भरड धान्य यांचं वैविध्यपूर्ण प्रदर्शन तसंच भारतीय वस्त्रांचं प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com