मादक पदार्थांची तस्करी तसंच अवैध व्यापारावर नियंत्रणासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज

Union Finance Minister Nirmala Sitharaman केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Need for international cooperation to control drug trafficking and illegal trade

मादक पदार्थांची तस्करी तसंच अवैध व्यापारावर नियंत्रणासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज

नवी दिल्ली : मादक पदार्थांची तस्करी तसंच इतर अवैध व्यापारावर नियंत्रणासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितलं.

Union Finance Minister Nirmala Sitharaman केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
File Photo

नवी दिल्लीत महसूल गुप्तचर संचालनालयाच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त त्या बोलत होत्या. अमली पदार्थांच्या बेकायदा व्यापारासंदर्भातली माहिती मिळावी यासाठी सहकारी देश आणि त्यांच्या संस्थांशी समन्वयानं काम करणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. या संदर्भातले गुन्हे शोधण्यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी तंत्रज्ञानाचा अधिक वापर करावा, असं आवाहन त्यांनी केलं.सीमा सुरक्षित ठेवण्याइतकंच माहिती सुरक्षित ठेवणं महत्त्वाचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

त्यांनी देशात होणाऱ्या कोकेन तस्करीबद्दल चिंता व्यक्त केली, ही चिंताजनक बाब आहे. त्या म्हणाली की भारत यापुढे ट्रान्झिट देश किंवा उपभोगणारा देश बनत नाही की नाही हे आम्हाला माहित असणे आवश्यक आहे.

त्यांनी भारतातील तस्करीविषयीचा २०२१-२२ चा अहवाल यावेळी प्रसिद्ध केला. संघटित तस्करीचे कल, व्यावसायिक फसवणूक आणि आंतरराष्ट्रीय सक्तवसुली कारवाया आणि सहकार्य यांचं विश्लेषण या आहवालात आहे. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्रा पंकज चौधरी, महसूल सचिव संजय मल्हाेत्रा उपस्थित होते.

४ डिसेंबर १९५७रोजी तस्करीविरोधी विषयांवर देशातील एपेक्स इंटेलिजेंस अँड एन्फोर्समेंट एजन्सी डीआरआय अस्तित्वात आली. नवी दिल्लीच्या मुख्यालयात, डीआरआयकडे १२ झोनल युनिट्स, ३५ प्रादेशिक युनिट्स आणि १५ उप-प्रादेशिक युनिट्स आहेत.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *