आयुष उपचारपद्धतींबद्दल जनजागृतीची आवश्यकता

Ayush-Mantralaya Govt of India

Union AYUSH Minister asserted that there is a need for public awareness about AYUSH treatment methods

आयुष उपचारपद्धतींबद्दल जनजागृतीची आवश्यकता असल्याचं केंद्रीय आयुष मंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली : ‘भारतातल्या औषधोपचाराच्या पारंपरीक पद्धतीची क्षमता आणि सामर्थ्याविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढवण्याची गरज असल्याचं केंद्रीय आयुषमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत सातव्या आयुर्वेद दिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात बोलत होते.Ayush-Mantralaya Govt of India

7 वा आयुर्वेद दिवस आज भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. “हर दिन हर घर आयुर्वेद” ही या वर्षीच्या आयुर्वेद दिनाची मुख्य संकल्पना असून आयुर्वेदाचे फायदे तळागाळातील लोकांसह मोठ्या जनसंख्येपर्यंत पोहोचावेत हा या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे.

सहा आठवडे चाललेल्या या सोहळ्यात देशभरातून मोठ्या प्रमाणावर लोकांचा सहभाग नोंदवला गेला. या निमित्ताने, भारत सरकारची २६ हून अधिक मंत्रालये आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या भारतीय मिशन आणि दूतावासांच्या सहकार्याने आयुष मंत्रालयाच्या संस्था/ परिषदांनी 5000 हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

आपल्या पारंपारिक औषधापचार पद्धतीमुळे रोगांपासून बचावासोबतच, मानवी आरोग्याची निगा राखली जाणं आणि ते वर्धीत होण्याचं काम होतं असं ते म्हणाले. हजारो वर्षांपासून वापरात असलेली ही पद्धत समजून घेतली तर, देश आत्मनिर्भर व्हायला मदत होईल असं ते म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष क्षेत्राला दिलेल्या पाठबळामुळे या क्षेत्रानं जागतिक पातळीवर वेगळं स्थान निर्माण केलं असल्याचं ते म्हणाले. देशभरातील दहा कोटी आदिवासी नागरीकांच्या हीताच्यादृष्टीनं विविध उपक्रम राबवता यावेत यासाठी आयुष तसंच आदिवासी व्यवहार मंत्रालयानं सामंजस्य करार केला असल्याची माहिती त्यांनी दिली.

आयुर्वेद हे रोग प्रतिबंधक शास्त्र असल्याचे यावेळी सर्बानंद सोनोवाल उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. आयुर्वेद आणि त्याच्या क्षमता लोकांपर्यंत पोहोचवणे हा हर दिन हर घर आयुर्वेद या उपक्रमाचा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले.

“आयुर्वेद हे एकमेव वैद्यकशास्त्र आहे जे केवळ आजारी पडल्यावर उपचारच नाही, तर रोगापासून बचाव करण्याविषयीही सांगते.” असे अर्जुन मुंडा यावेळी म्हणाले.

आयुष मंत्रालयाने देशातील आयुष उपचार पद्धतीला गती दिली असून आयुर्वेदाला आता जगातील 30 देशांमध्ये मान्यता मिळाली आहे, अशी माहिती डॉ. मुंजपारा महेंद्रभाई कालूभाई यांनी दिली.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *