अंमली पदार्थांच्या विरोधात सर्वसामर्थ्यानिशी लढण्याची गरज

Union Home Minister Amit Shah केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News,

Union Home Minister Amit Shah expressed the need to fight against drugs with all might

अंमली पदार्थांच्या विरोधात सर्वसामर्थ्यानिशी लढण्याची गरज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून व्यक्त

नवी दिल्‍ली : केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये “अंमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा” या विषयावरील एका उच्चस्तरीय प्रादेशिक बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. Union Home Minister Amit Shah केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News,

या बैठकीला गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान या राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव राज्याचे मुख्यमंत्री / उपमुख्यमंत्री / प्रशासकांसह केंद्र सरकार आणि राज्य सरकारांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अंमली पदार्थांच्या विरोधात सर्वसामर्थ्यानिशी लढण्याची गरज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा य़ांनी व्यक्त केली आहे. ते आज गुजरातमधे गांधीनगर इथं अंमली पदार्थांचा चोरटा व्यापार आणि राष्ट्रीय सुरक्षा या मुद्यांवर विभागीय बैठकीला संबोधित करत होते. देशात सध्या अंमली पदार्थांच्या विरोधातली लढाई महत्वाच्या टप्प्यावर आहे, असं त्यांनी सांगितलं.

अंमली पदार्थांची कीड नव्या पिढीला पोखरत आहे. अंमली पदार्थांच्या व्यापारातून येणारा पैसा दहशतावादाचं पोषण करत आहे. ते रोखण्यासाठी आणि यापासून नव्या पिढीला वाचवण्यासाठी केंद्र आणि राज्यसरकारच्या सर्व यंत्रणांना एकत्रितपणे प्रयत्न करावे लागतील, असं ते म्हणाले

श्री अमित शाह म्हणाले की एकीकडे अंमली पदार्थ वाळवीसारखा आपल्या युवा पिढीला पोखरून संपवत आहेत आणि दुसरीकडे अंमली पदार्थांच्या व्यापारातून येणारा पैसा दहशतवादाला देखील पोसत आहे. ते म्हणाले की देशाच्या युवा पिढ़ीला सुरक्षित ठेवण्याच्या आणि दहशतवादाच्या अर्थपुरवठ्यावर कठोर आघात करण्याच्या दृष्टीने या लढाईला भारत सरकारच्या सर्व संस्था, राज्य सरकारच्या सर्व संस्था आणि पोलिसांनी एकत्रित लढाई मानून लढले पाहिजे आणि विजय प्राप्त केला पाहिजे.

अमित शाह म्हणाले की अंमली पदार्थांविरोधातील लढाईत प्रभावी कामगिरी करण्यासाठी मोदी सरकारने ‘Whole of Government Approach’अंतर्गत आंतर विभागीय समन्वयावर सातत्याने भर दिला आहे ज्याचे अल्पावधीतच यशस्वी परिणाम दिसत आहेत आणि 2014 नंतर अंमली पदार्थांचे साठे पकडण्याच्या आणि जप्त करण्याच्या प्रमाणात झालेली वाढ हा त्याचा पुरावा आहे. देशात अंमली पदार्थांच्या वितरणाच्या जाळ्याला उद्ध्वस्त करण्याच्या धोरणाचे यश या ठिकाणी दिसत आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *