नीट – युजी (NEET-UG 2022) चा निकाल जाहीर

NEET Exam. Hadapsar Latest News, Hadapsar News हडपसर मराठी बातम्या

NEET-UG Result Declared; More than 993,000 candidates cleared the entrance exam

नीट – युजी (NEET-UG 2022) चा निकाल जाहीर

993,000 हून अधिक उमेदवार प्रवेश परीक्षा उत्तीर्ण

नवी दिल्ली : राष्ट्रीय चाचणी संस्थेनं (National Testing Agency) नीट-युजी २०२२ या परिक्षेचा निकाल जाहीर केला आहे. NEET Exam. Hadapsar Latest News, Hadapsar News हडपसर मराठी बातम्या

राजस्थानमधल्या तनिष्का हिनं पहिला, दिल्लीतल्या वत्स आशिष बत्रानं द्वितीय आणि कर्नाटकातील हृषिकेश नागभूषण गांगुले यानं तृतीय क्रमांक पटकावला आहे. १७.६४ लाख उमेदवार परीक्षेला बसले होते.

परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेश (१.१७ लाख), त्यानंतर महाराष्ट्र (१.१३ लाख) आणि राजस्थान (८२,५४८) आहेत.

१७ जुलै रोजी देशभरातील ४९७ शहरांमध्ये आणि भारताबाहेरील १४ शहरांमधील ३,५७० विविध केंद्रांवर झालेल्या प्रवेश परीक्षेत सुमारे ९५ टक्के उपस्थिती नोंदवण्यात आली होती.

आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू अशा १३ भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली.

प्रथमच, अबू धाबी, बँकॉक, कोलंबो, दोहा, काठमांडू, क्वालालंपूर, लागोस, मनामा, मस्कत, रियाध, शारजा, सिंगापूर दुबई आणि कुवेत सिटी येथे परीक्षा घेण्यात आली.

यावर्षी १८ लाख ७२ हजारांहून अधिक उमेदवारांनी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केली होती, प्रत्यक्षात १७ लाख ६४ हजार उमेदवार परीक्षेला बसले होते. त्यापैकी सुमारे नऊ लाख ९३ हजार उत्तीर्ण झाले.

नीट-युजी १७ जुलै रोजी भारतातील ४९७ आणि भारताबाहेरील १४ शहरांमध्ये ३ हजार ५७० केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *