Neral-Matheran Railway resumes today after a 3-year hiatus
३ वर्षाच्या खंडानंतर नेरळ-माथेरान रेल्वे आजपासून पुन्हा सुरू
मुंबई : माथेरान पर्यटन स्थळाकडे जाण्यासाठी तीन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नेरळ – माथेरान मिनी ट्रेन आज सुरु करण्यात आली. कोविडच्या काळात म्हणजे ऑगस्ट २०१९ पासून ही मिनी रेल्वे गाडी बंद करण्यात आली होती. दरम्यान अतिवृष्टीमुळे नेरळ ते माथेरान घाटातला रेल्वेमार्ग पूर्णतः वाहून गेला होता.
आज सकाळी ८ वाजुन ५० मिनिटांनी पहिली रेल्वेगाडी नेरळ स्थानकातून माथेरान कडे रवाना झाली. सध्या नेरळ ते माथेरान दोन आणि माथेरान ते नेरळ दोन अश्या चार फेऱ्या दिवसभरात चालू ठेवल्या जाणार आहेत.
माथेरान ते नेरळ या मिनी ट्रेनची सर्वांना प्रतिक्षा होती. अखेर तीन वर्षात्या प्रतिक्षेनंतर सेवा सुरू झाली आहे. ही सेवा सुरु झाल्यामुळं प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. माथेरान ते नेरळ ही मिनी ट्रेन सेवा नोव्हेंबरपर्यंत रुळावर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
अखेर ऑक्टोबरमध्येच ही सेवा सुरू करण्यात आली आहे. 2019 मध्ये माथेरानमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं नेरळ ते माथेरान दरम्यानच्या डोंगर भागातील रेल्वे रुळांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळं गेल्या तीन वर्षांपासून नेरळ-माथेरान मार्ग बंद होता. तर अमन लॉज ते बाजारपेठ मार्गावर शटल रेल्वे सुरु होती. गेल्या अनेक दिवसापासून रुळ बदलण्याचं काम सुरु होतं. अखेर हे सर्व काम आता पूर्ण झालं आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com