नेट परीक्षेसाठी आता ३० मे पर्यंत अर्ज दाखल करता येणार

Applications for the NET exam can now be submitted till May 30

नेट परीक्षेसाठी आता ३० मे पर्यंत अर्ज दाखल करता येणार

नवी दिल्ली : राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात युजीसी- नेट, परीक्षेचे ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरण्याची मुदत वाढवण्यात आली असून त्यासाठीची अंतिम तारीख ३० मे २०२२ आहे, अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांनी ट्विटर संदेशाद्वारे दिली आहे.

यापूर्वी २० मे ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. डिसेंबर २०२१ आणि जून २०२२ च्या परीक्षांसाठी ही मुदतवाढ करण्यात आली आहे. UGC-NET परीक्षा राष्ट्रीय परीक्षा संस्थेद्वारे घेतली जाते. देशातली विद्यापीठं आणि महाविद्यालयांमध्ये ‘सहाय्यक प्राध्यापक’ आणि ‘ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि असिस्टंट प्रोफेसर’ पदांसाठी ही पात्रता परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते.

उमेदवार त्यांचा अर्ज सबमिट करण्यासाठी अधिकृत वेबसाइट https://ugcnet.nta.nic.in/  ला भेट देऊ शकतात

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *