नेताजी सुभाषचंद्र बोस देशभक्तांचे देशभक्त

Netaji Subhas Chandra Bose's grand statue to be installed at India Gate says PM.

Netaji Subhash Chandra Bose is a patriot of patriots

नेताजी सुभाषचंद्र बोस देशभक्तांचे देशभक्त

– प्राचार्य दत्तात्रय जाधव.Netaji Subhas Chandra Bose's grand statue to be installed at India Gate says PM.

हडपसर : शेवटच्या श्वासापर्यंत आणि रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत देशासाठी लढणारे थोर स्वातंत्र्यसेनानी,महान देशभक्त म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस होय.”तुम मुझे खून दो,मैं तुम्हें आझादी दुंगा “असा क्रांतीचा नारा देऊन तरूणांना स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा नेताजींनी दिली. त्यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतात पराक्रम दिन म्हणूनही साजरा करतात. नेताजी सुभाषचंद्र बोस हे देशभक्तांचे देशभक्त होते असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद व आजीव सभासद बोर्ड सचिव, प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.

साधना विद्यालय व आर आर शिंदे ज्युनिअर कॉलेज हडपसर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

सिद्धार्थ देशमुख,चैतन्य पाटील,ओंकार जाधव या विद्यार्थ्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षक मनोगतात ज्योती मिसाळ यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगितले.

या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव ,उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,कुमार बनसोडे,माधुरी राऊत ,आजीव सभासद लालासाहेब खलाटे,आजीव सेवक अनिल मेमाणे, स्कृतिक विभागाचे सर्व सदस्य ,विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल वाव्हळ यानी केले.सूत्रसंचालन रूपाली सोनावळे यांनी केले.तर आभार सविता पाषाणकर यांनी मानले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *