वस्तू आणि सेवा कराचे नवे दर आजपासून लागू

Goods & Service Tax हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

New GST rates effective from today

वस्तू आणि सेवा कराचे नवे दर आजपासून लागू

नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कराचे नवे दर आजपासून लागू झाले आहेत. त्यामुळं काही वस्तूंवर अधिक कर लागेल तर काही वस्तूंवरचा कराचा भार कमी होणार आहे. जीएसटी कौन्सिलच्या ४७ व्या बैठकीत झालेल्या निर्णयांनुसार काही वस्तूंना जीएसटीमधून देण्यात आलेली सवलत हटवण्यात आली आहे.GST Council Hadapsar Latest News, Hadapsar News हडपसर मराठी बातम्या

धनादेश देण्यासाठी बँका आता १८ टक्के जीएसटीची आकारणी करतील. प्रतिदिन हजार रुपयांपेक्षा अधिक असलेल्या हॉटेलच्या खोलीच्या भाड्यावर १२ टक्के कर लागेल. सोलर हिटरवर पूर्वी ५ टक्के लागणारा जीएसटी आता १२ टक्के झालाय. तर इलेक्ट्रॉनिक कचऱ्यावरचा जीएसटी ५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर गेलाय.

रोपवे ने होणारी वाहतूक आता स्वस्त झाली आहे. यापूर्वी रोप वे च्या माध्यमातून प्रवासी आणि मालवाहतूक करण्यासाठी १२ टक्के कर द्यावा लागत होता. आता ही रक्कम ५ टक्क्यांवर आली आहे. बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांसाठीही ५ टक्के जीएसटी लागेल.

ईशान्येकडची राज्यं आणि बागडोगराहून येणाऱ्या विमान प्रवाशांना जीएसटीमधून मिळणारी सूट आता केवळ इकॉनॉमी श्रेणीसाठी मर्यादित ठेवण्यात आली आहे. वित्त मंत्रालयाने म्हटले आहे की, 25 किलोग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे तृणधान्ये, कडधान्ये आणि पीठ यांसारख्या अनब्रँडेड प्री-पॅक्ड आणि लेबल नसलेल्या खाद्यपदार्थांवर जीएसटी लागू होणार नाही.

त्यात म्हटले आहे की, जर अंतिम ग्राहकांना किरकोळ विक्रीसाठी अनेक पॅकेजेस, जसे की प्रत्येकी 10 किलोग्रॅमचे 10 पॅकेज मोठ्या पॅकमध्ये विकले गेले, तर अशा पुरवठ्यावर जीएसटी लागू होईल. तथापि, एका वैयक्तिक पॅकेजमध्ये 50 किलोग्रॅम असलेले तांदूळ हे GST आकारणीच्या उद्देशाने प्री-पॅकेज केलेले आणि लेबल केलेले कमोडिटी मानले जाणार नाही.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *