“नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारतीय तरुणांना नव्या शतकासाठी तयार करत आहे”

Infrastructural projects inaugurated in Mumbai will make life of citizens more bearable - Prime Minister मुंबईत उद्घाटन झालेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळं नागरिकांचं जीवन सुसह्य होईल - प्रधानमंत्री हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

“New National Education Policy Preparing Indian Youth for the New Century”

“नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारतीय तरुणांना नव्या शतकासाठी तयार करत आहे”

प्रत्येक तरुणाला आवडीनुसार नव्या संधी मिळाव्यात यासाठी केंद्र आणि उत्तराखंड सरकार सातत्याने प्रयत्नशील- प्रधानमंत्री नरेंद्र मोदीInfrastructural projects inaugurated in Mumbai will make life of citizens more bearable - Prime Minister मुंबईत उद्घाटन झालेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळं नागरिकांचं जीवन सुसह्य होईल - प्रधानमंत्री हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

नवी दिल्ली : नवीन शैक्षणिक धोरणामध्ये देशाच्या युवा वर्गाला नव्या शतकासाठी तयार करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज उत्तराखंड इथल्या रोजगार मेळ्याला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना बोलत होते.

उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी अधोरेखित केले की ज्यांना आज त्यांची नियुक्ती पत्रे मिळाली आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस एक नवीन सुरुवात आहे. ही केवळ आयुष्य बदलून टाकणारी संधी नाही तर सर्वांगीण बदलाचे माध्यम आहे असे ते म्हणाले.

शैक्षणिक क्षेत्रात देशात होत असलेल्या नवनवीन प्रयोगांचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, नियुक्ती पत्रे प्राप्त बहुतेक युवक शिक्षण क्षेत्रात काम करतील. “नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारतातील युवकांना नवीन शतकासाठी तयार करत आहे , हा संकल्प पुढे नेण्याची जबाबदारी उत्तराखंडच्या युवकांवर आहे असे पंतप्रधानांनी सांगितले.

उत्तराखंडच्या युवा वर्गाने राज्याच्या तसंच देशाच्या विकासात भरीव योगदान द्यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. युवा वर्गानं आपल्या सेवेच्या माध्यमातून हे अभियान पुढे नेऊन त्याला आणखी मजबूत करायला हवं, असं त्यांनी म्हटलं आहे. रोजगार मेळा हा केंद्रीय पातळीवर १० लाख रोजगाराची निर्मिती करण्यासाठीचा सरकारचा एक उपक्रम आहे.

उत्तराखंडमधील पर्यटन क्षेत्राचा विस्तार होत असून परिणामी दुर्गम भाग रस्ते, रेल्वे आणि इंटरनेटने जोडले जात आहेत आणि पर्यटन नकाशावर नवीन पर्यटन स्थळे येत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. यामुळे उत्तराखंडमधील तरुणांना आता मोठ्या शहरांमध्ये जाण्याऐवजी त्यांच्या घराजवळ तशाच रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

पर्यटन क्षेत्रात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींना चालना देण्यासाठी मुद्रा योजना महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. दुकाने, ढाबे, गेस्ट हाऊस आणि होमस्टेची उदाहरणे देत पंतप्रधानांनी नमूद केले की अशा व्यवसायांना कोणत्याही हमीशिवाय 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात आहे.

देशभरात आतापर्यंत 38 कोटी मुद्रा कर्ज देण्यात आली आहेत. सुमारे 8 कोटी युवक प्रथमच उद्योजक बनले आहेत,” असे पंतप्रधान म्हणाले. अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती /इतर मागास वर्गीय प्रवर्गातील महिला आणि तरुणांची संख्या सर्वाधिक आहे अशी माहिती त्यांनी दिली.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *