वायुदलासाठी नवीन शस्त्रप्रणालीला केंद्र सरकारची मंजुरी

The Indian Air Force भारतीय हवाईदल हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Central Government approves new weapon system for Air Force

वायुदलासाठी नवीन शस्त्रप्रणालीला केंद्र सरकारची मंजुरी

नवी दिल्ली : भारतीय हवाईदलाची स्थापना ८ ऑक्टोबर १९३२ ला झाली. हवाईदल आज आपला ९१वा वर्धापनदिन साजरा करत आहे. या निमित्ताने आज दुपारी चंदीगढच्या सुखना तलावावर हवाई दलाचा फ्लाय पास्ट होईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या सोहळ्याला उपस्थित असतील. The Indian Air Force भारतीय हवाईदल हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News

हा सोहळा प्रथमच दिल्लीशिवाय अन्य शहरात होत आहे. एकूण ७५ विमाने या फ्लायपास्टमध्ये भाग घेतील, तर ९ विमाने राखीव असतील. एलसीएच ही हवाईदलाने नुकतीच खरेदी केलेली विमाने सुखना लेकवरच्या आकाशात आपल्या प्रेक्षणीय करामती दाखवतील. याशिवाय तेजस, सुखोई, जग्वार, राफेल आणि हॉक विमाने या सोहळ्याचा भाग असतील.

सरकारने शस्त्रास्त्र निर्मिती (वेपन सिस्टम,WS) शाखा नावाची नवीन शाखा तयार करण्यास मान्यता दिली असून भारतीय हवाई दलाने (IAF) उचललेले हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. या डब्ल्यूएस शाखेच्या निर्मितीमुळे जमिनीवरून मारा करणाऱ्या आणि विशेष हवाई शस्त्रास्त्रांच्या (वेपन सिस्टम) सर्व समर्पित परीचालनाचे एकत्रीकरण होऊन सर्व शस्त्र प्रणालींचे परीचालन एकाच छत्राखाली होईल.

या शाखेत पृष्ठभागावरून-ते-पृष्ठभागापर्यंत मारा करणारी क्षेपणास्त्रे,पृष्ठभागावरून-हवेत मारा करणारी- क्षेपणास्त्रे, दूरस्थपणे (रीमोटने) चालवली जाणारी एअरक्राफ्ट आणि जुळ्या/मल्टी-क्रू विमानांमधील शस्त्र प्रणाली अशा परीचालनाच्या‌ चार विशेष शाखांमधील परीचालकांचा समावेश असेल. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ क्षमतेत वाढ होण्यासाठी ही शाखा खूप मोठे योगदान देईल.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हवाईदलातल्या वीरांना तसंच त्यांच्या कुटुंबियांना हवाईदल दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *