In the next six months, the traffic jam in the Dinanath Mangeshkar Hospital area will be resolved
येत्या सहा महिन्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार
डी पी रस्त्यावरून रुग्णालयाकडे कलव्हर्ट छोटा पूल ) ला मान्यता – रुग्णालय प्रशासनाचे आभार – संदीप खर्डेकर.
गेली अनेक वर्षे माई मंगेशकर पथावरील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरातील रहिवासी वाहतूक कोंडीने त्रस्त होते. येथील कोंडी सुटावी आणि नागरिकांना कमीत कमी मनस्ताप व्हावा यासाठी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, रुग्णालय प्रशासन, पोलीस अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी सातत्याने प्रयत्नशील होते व विविध उपाययोजना देखील करत होते,मात्र त्या छोट्या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे प्रश्न सुटत नव्हता.
हिमाली, संकुल यासारखे मोठे गृहप्रकल्प, सेवासदन शाळा ह्या सगळ्यामुळे येथे वाहतुकीवर ताण येत होता. रुग्णालय प्रशासनाने रस्त्यावर पार्किंग होऊ नये यासाठी विविध उपाययोजना केल्या आणि रुग्णालयाच्या आवारात प्रशस्त पार्किंग उपलब्ध केले,मात्र रुग्णांचे अनेक नातेवाईक रस्त्यावर पार्किंग करून घाईगडबडीत रुग्णालयात जात असतात, याचा ही वाहतुकीला अडथळा होत होता.
यासंदर्भात रुग्णालय प्रशासनासोबत दोन दिवसापूर्वी श्री. संदीप खर्डेकर यांची विस्तृत चर्चा झाली असता आम्ही डी पी रस्त्यावरील ( म्हात्रे पूल ते राजाराम पूल दरम्यान ) एक प्लॉट खरेदी केला असून तेथून रुग्णालयापर्यंत रस्ता करण्यास मान्यता मिळाली आहे, तसेच तेथील नाल्यावर कलव्हर्ट ( छोटा पूल ) बांधण्यास ही सर्व संबंधित खात्यांची परवानगी मिळाली असल्याचेही रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले.
याबाबत मनपा च्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी ही यांस दुजोरा दिला.ह्या छोटेखानी पुलाच्या उभारणीचा सर्व खर्च दीनानाथ मंगेशकर रुग्णालय करणार असून त्याबद्दल लवकरच रुग्णालया प्रशासनाचा नागरिकांच्या वतीने सत्कार करणार असल्याचेही संदीप खर्डेकर म्हणाले.
येत्या सहा महिन्यात ह्या पुलाची उभारणी पूर्ण होईल आणि रुग्णालयात येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी प्रशस्त रस्ता उपलब्ध होईल.
हडपसर न्यूज ब्युरो