NIA carries out searches at various locations in Bihar against PFI
पाप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या बिहारमधल्या 12 ठिकाणांवर राष्ट्रीय तपास संस्थेचे छापे
दरभंगा शहरातल्या उर्दू बाजार, मोतिहारी मधल्या कुनवा या ठिकाणी छापे
संबधित व्यक्तींची कागदपत्रे ताब्यात
दरभंगा : केंद्र सरकारनं बंदी घातलेल्या पाप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या बिहारमधल्या 12 ठिकाणांवर राष्ट्रीय तपास संस्थेनं म्हणजेच NIA नं काल छापे टाकले.
दरभंगा शहरातल्या उर्दू बाजार, मोतिहारी मधल्या कुनवा या ठिकाणी छापे टाकून या दलानं संबधित व्यक्तींची कागदपत्रे ताब्यात घेतली.
दरभंगा शहरातील उर्दू बाजारातील दंतचिकित्सक डॉ. सारिक रझा आणि सिंगवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील शंकरपूर गावात राहणारा मेहबूब, पीएफआय या प्रतिबंधित संघटनेशी संबंधित असलेल्यांवर छापा टाकला जात आहे.
मोतिहारीमध्ये आणखी एका ठिकाणी एनआयएच्या पथकाने पूर्व चंपारण जिल्ह्यातील चकिया उपविभागातील कुआनवा गावात छापा टाकला.
पीएफआयशी संबंधित एका प्रकरणात सज्जाद अन्सारीच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात येत आहे. सज्जाद गेल्या 14 महिन्यांपासून दुबईत काम करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरभंगा शहरातल्या उर्दू बाजार, मोतिहारी मधल्या कुनवा या ठिकाणी छापे टाकून या दलानं संबधित व्यक्तींची कागदपत्रे ताब्यात घेतली.
एनआयएच्या टीमने सज्जादचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि त्याच्या राहत्या घरातून काही कागदपत्रे जप्त केली आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्याच्या संलग्न संघटनांना ‘अनलॉफुल असोसिएशन’ घोषित केले होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com