एनआयएनं केलेल्या छापेमारीत मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी स्वरूपाचं साहित्य जप्त

National Investigation Agency

A large amount of criminal material was seized in the raid conducted by NIA in Naupada fake note case

नौपाडा बनावट नोटा प्रकरणी एनआयएनं केलेल्या छापेमारीत मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी स्वरूपाचं साहित्य जप्त

धारदार शस्त्र, डिजिटल उपकरणं आणि कागदपत्रांचा समावेश

बनावट चलनाच्या रॅकेटमध्ये डी-कंपनीचा थेट संबंधNational Investigation Agency

मुंबई : नौपाडा बनावट नोटा प्रकरणी एनआयए, अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं काल मुंबईत विविध ठिकाणी केलेल्या छापेमारीत मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी स्वरूपाचं साहित्य जप्त केलं. यामध्ये धारदार शस्त्र, डिजिटल उपकरणं आणि कागदपत्रांचा समावेश आहे. त्यामुळे, बनावट चलनाच्या रॅकेटमध्ये डी-कंपनीचा थेट संबंध असल्याच्या एनआयएच्या यापूर्वीच्या तपासातल्या निष्कर्षाला मजबूत पाठबळ मिळालं आहे.

२०२१ मध्ये, NIA ने १८ नोव्हेंबर रोजी ठाणे शहरातील नौपाडा पोलिस स्टेशनमध्ये IPC आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा, १९६७ च्या संबंधित कलमांखाली नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारे दोन लोकांना अटक केली, असे तपास संस्थेने सांगितले.

२०२१ मध्ये ठाणे जिल्ह्यात नौपाडा इथं २ हजार रुपयांच्या उच्च प्रतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. एनआयए नं काल केलेली कारवाई या प्रकरणाशी संबंधित होती. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली होती, आणि ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ठाणे पोलिसांनी या हाय-प्रोफाइल प्रकरणातल्या आरोपींचा शोध घेतला होता आणि आरोपपत्रही सादर केलं होतं. हे प्रकरण नंतर एनआयए कडे सोपवण्यात आलं होतं, आणि ७ फेब्रुवारी२०२३ रोजी ते पुन्हा दाखल केलं होतं.

हे प्रकरण दोन हजार रुपयांच्या बनावट भारतीय चलनी नोटा जप्त करण्याशी संबंधित आहे. नौपाडा पोलिस स्टेशन, ठाणे शहर, महाराष्ट्र येथे दाखल झालेल्या गुन्ह्यात रियाझ आणि नसीर या दोन आरोपींना अटक करण्यात आली.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *