AAI has undertaken installation of night landing facility at Kolhapur airport
एएआयअर्थात भारतीय विमानतळ प्राधिकरणाने कोल्हापूर विमानतळ परिसरात रात्रीच्या वेळी विमान उतरवण्यासाठीच्या सुविधांची उभारणी.
नवी दिल्ली : विमानतळांचे अद्ययावतीकरण आणि आधुनिकीकरण तसेच रात्रीच्या वेळी विमान उतरविण्यासाठीच्या सुविधा उभारणे ही सतत सुरु राहणारी प्रक्रिया असून जमिनीची उपलब्धता, व्यावसायिक व्यवहार्यता, आर्थिक-सामाजिक विचारप्रवाह, वाहतुकीच्या दृष्टीने गरज तसेच या विमानतळांवरील आवागमनाबाबत विमान कंपन्यांची इच्छा यांच्या अनुकुलतेनुसार एएआय (Airports Authority of India) अर्थात विमानतळ प्राधिकरण आणि इतर विमानतळ परिचालक यांच्यातर्फे ही कामे हाती घेतली जातात.
सध्याच्या काळात रात्रीच्या वेळी विमानतळांवर विमाने उतरविण्याची सोय करण्याची मागणी वेगाने वाढत आहे आणि विमान कंपन्यांच्या गरजेवर आधारित परिचालन सुविधा तसेच जमिनीची उपलब्धता या दोन्ही बाबी, वेळापत्रकानुसार विमानोड्डाणे सुरु असणाऱ्या 25 कार्यान्वित विमानतळांवर ही सुविधा उपलब्ध नाही
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने कोल्हापूर विमानतळ परिसरात रात्रीच्या वेळी विमाने उतरविण्यासाठी आवश्यक सुविधांच्या उभारणीचे काम हाती घेतले आहे. डीजीसीए (Directorate General of Civil Aviation (DGCA) )अर्थात नागरी हवाई उड्डाण महासंचालनालयाच्या पथकाने 10 जून 2022 रोजी विमानतळाचे परिक्षण केले आहे. या परिक्षणादरम्यान डीजीसीएने नोंदविलेल्या निरीक्षणांनुसार नियम पालनाबाबत प्राधिकरणाने या आधीच कार्यवाही सुरु केली आहे.
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री (जनरल (डॉ.) )व्हि.के.सिंग (निवृत्त) यांनी आज राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com