Nitin Gadkari proposes to set up Innovation Bank
इनोव्हेशन बॅंकची स्थापना करायचा नितीन गडकरी यांचा प्रस्ताव
नवी दिल्ली : पायाभूत विकास क्षेत्रातल्या दर्जावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी नवीन कल्पना, संशोधनातले निष्कर्ष आणि तंत्रज्ञानासाठी इनोव्हेशन बॅंकची स्थापना करायचा प्रस्ताव रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मांडला आहे. नवी दिल्लीत आयआरसी अर्थात इंडियन रोड कॉंग्रेसच्या २२२ व्या मध्यावधी परिषद आभासी बैठकीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
सगळ्या अभियंत्यांनी नवीनतेवर भर दिला पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं. पायाभूत सुविधा क्षेत्रातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आयआरसीनं आयआयटी आणि जागतिक संस्थांच्या मदतीनं जागतिक दर्जाची अत्याधुनिक प्रयोगशाळा विकसित केली पाहिजे, असंही ते म्हणाले.
गेल्या आठ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांची लांबी ५० टक्क्याहून अधिक वाढली आहे. २०१४ मधे ९१ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते होते ते आता एक लाख ४७ हजार किलोमीटर लांबीचे आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. २०२५ पर्यंत राष्ट्रीय महामार्गाचं जाळं २ लाख किलोमीटरपर्यंत विस्तारीत करण्यासाठी सरकार काम करत असल्याचं ते म्हणाले.
हडपसर न्युज ब्युरो