मुंबई-गोवा महामार्ग हरित महामार्ग बनवण्याचं नितीन गडकरी यांचं आवाहन

Nitin Gadkari’s appeal to make Mumbai-Goa highway a green highway

मुंबई-गोवा महामार्ग हरित महामार्ग बनवण्याचं नितीन गडकरी यांचं आवाहनNitin Gadkari's appeal to make Mumbai-Goa highway a green highway हडपसर मराठी बातम्या , Hadapsar Latest News, Hadapsar News

नवी मुंबई : मुंबई गोवा महामार्ग हरित महामार्ग बनवण्याचं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

नवी मुंबईमध्ये जेएनपीटीकडे जाणार्याम चार मार्गांचा लोकार्पण सोहळा, कळंबोली सर्कल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पूर्वेकडील द्वाराचं भूमिपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते काल झालं. त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई गोवा महामार्गावर झाडं कमी आहेत. त्यामुळे सर्व आमदारांनी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घ्यावा असं ते यावेळी म्हणाले.

चिरनेर ते चौक या नवीन महामार्गाची घोषणा गडकरी यांनी यावेळी केली. या महामार्गावर चार टनेल असतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. नवी मुंबईत केवळ १३ ते २१ मिनिटांमध्ये वॉटर टॅक्सीनं येता येईल. त्यामुळे इथे येणाऱ्या नागरिकांनी जलमार्गालाच प्राधान्य द्यावं असं आवाहन त्यांनी केलं.

Hadapsar News Bureau.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *