No instructions were given to banks on loading Rs 2000 notes in ATMs
एटीएममधे २ हजारच्या नोटा न भरण्याचे आदेश बँकांना दिले नसल्याचं सरकारचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली : देशातल्या बँकांना ऑटोमेटेड टेलर मशिन्स (ATM) मशीन्समध्ये दोन हजार च्या नोटा न भरण्याच्या कोणत्याही सूचना सरकारने बँकांना दिलेल्या नाहीत असं स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिल.
ग्राहकांच्या गरजांमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करून बँकाच हा निर्णय घेत असतात असं त्यांनी सांगितलं.
रिझर्व्ह बँकेकडे २०१९-२० या आर्थिक वर्षानंतर दोन हजाराच्या नोटांची मागणी आली नसल्याची माहिती सीतारामन यांनी दिली. मार्च २०१७ मध्ये वापरात असलेल्या पाचशे आणि दोन हजाराच्या नोटांच एकूण मूल्य ९ कोटी ५१ रुपये होतं ते वाढून मार्च २०२२ मध्ये २७ कोटी ५ लाखाच्या आसपास झालं होत असं सीतारामन यांनी म्हटलं आहे.
त्या म्हणाल्या , आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार, 2019-20 पासून दोन हजार रुपयांच्या नोटांच्या पुरवठ्यासाठी मागणी केलेली नाही.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com